मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय ?

Vivek Investment > Marathi > मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय ?

शेअर मार्केट मध्ये तुम्ही कोणतीही कंपनी निवडा या तीन श्रेणीं (CATEGORY) पैकी कुठल्यातरी एका श्रेणीत येते

स्मॉल कॅप (SMALL CAP). 

मिड कॅप  (MID CAP) आणि 

लार्ज काप (LARGE CAP).

कॅप (CAP) म्हणजे कॅपिटलायझेशन (CAPITALIZATION). मार्केट कॅपिटलायझेशन कंपनीचे अग्रिगेट वेल्ह्यू ( AGGREGATE VALUE) म्हणजे कंपनीचे एकूण मूल्य दर्शवतात. मार्केट कॅपिटलायझेशनमुळे  कंपनीचा आकार (SIZE) पण कळते

मार्केट कॅपिटलायझेशनचा फॉर्मुला आहे:- 

Market Capitalization = Market Price of १ Share * No. of Outstanding Shares. 

उदा. XYZ नावाची कंपनी आहे त्याच्या एका शेअरची किंमत १००० रु. आणि कंपनीचे आऊट स्टँडिंग शेअर्स आहेत १००००० म्हणजे 

MARKET CAPITALIZATION = १००० * १०००००

                                                =   १००००००००.

ज्या कंपनीचा मार्केट कॅपीटलायझेशन ३०००० Cr. पेक्षा जास्त आहे तिला लार्ज कॅप (LARGE CAP) असे म्हणतात. ज्या कंपनीचा मार्केट कॅपीटलायझेशन १५००० Cr. ते ३०००० Cr.रु. आहे तिला मिड कॅप (MID CAP) कंपनी असे म्हणतात. आणि जी कंपनी १५००० Cr. रु पेक्षा कमी आहे त्यांना स्मॉल कॅप (SMALL  CAP) असे म्हणतात

स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप यांचा कुठला कायमस्वरूपी असामापदंड (CRITERIA)” नाही आहे. काही वर्षांपूर्वी काही कंपन्यांचा मार्केट कॅपीटलायझेशन १५००० Cr. रु. होते त्याला लार्ज कॅप (LARGE CAP) कंपनी म्हंटले जात होते. पण आज १५००० Cr रु कॅपीटलायझेशन असणाऱ्या कंपनीला मिड कॅप (MID CAP) असे म्हणतात

स्मॉल कॅप कंपन्या ह्या सुरवातीला स्टार्टअप (START UP) मध्ये येतात. या कंपन्यांची विकास वाढीची शक्यता (GROWTH POSSIBILITIES) जास्त असते. पण ह्या कंपनींकडून धोका पण तेवढाच असतो

स्मॉल कॅप निर्देशांक (INDEX) S&P BSE Small Cap हा स्मॉल कॅपची कामगिरी दाखवतो. मिड कॅप निर्देशांक (INDEX)  S&P BSE MID CAP हा मिड कॅपची कामगिरी दाखवतो

TCS, INFY, RELIANCE INDUSTRIES , L&T हे सगळे लार्ज कॅप कंपनी आहेत. सगळ्या लार्ज कॅप कंपन्या आपापल्या सेक्टर (SECTOR) मध्ये मोठ्या असतात. लार्ज कॅप कंपन्या ह्या निफ्टी (NIFTY) आणि सेन्सेक्स (SENSEX) मध्ये असतात

एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक लार्ज कॅप कंपनी हि पहिले स्मॉल कॅप आणि मिड कॅप होती आणि सगळ्याच कंपन्या ह्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप वरून लार्ज कॅप नाही बनत.   

आजचा लेख तुम्हाला कसा वाटला हे कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका. शेअर मार्केट गुंतवणुकीविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला ९६६४३३७८३६ या नंबर वर संपर्क करू शकता आमच्या फेसबुक पेजला पण FOLLOW  करा 

 

       धन्यवाद. 

 

5 Responses
  1. Dipak b. Shigawan

    नमस्कार..!
    सर आपण या मध्ये कमी कमी किती पैसे गुंतवू शकता आणि Account कस Open करू शकतो

    1. कमीत कमी सर तुम्ही १०००० पासून स्टार्ट करू शकता. आणि डिमॅट अकाऊंट ओपन करायचे असल्यास तुम्ही मला कॉल करू शकता.

Leave a Reply

×