I.P.O मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रथम आपणास त्यांच्या कार्यपद्धती बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. I.P.O विषयी माहिती खालील प्रमाणे.
कंपनी चे व्यवस्थापक (Board of Directors):-
कंपनीतील बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांची रचना एका IPO ला समजणे खूप कठीण आहे. प्रथम म्हणजे बोर्ड कंपनीचे अंतर्गत डायरेक्टर्स आणि बाहेरचे स्वतंत्र डायरेक्टर्स मिळून तयार झालेली असते. अंतर्गत डायरेक्टर्स कंपनीच्या मॅनेजमेंट, शेअरधारक, व्हेनचर्स कॅपिटल्स आणि मित्रपरिवारपैकी कोणीही असू शकतो. बाहेरील डायरेकटर्स कंपनीशी कोणते अर्थव्यवहार अथवा खाजगी संबंध नसतात त्यामुळे त्यांना विरोध होऊ शकतो. परंतु ते बोर्डवर असतात ते त्यांच्या व्यापारातील चांगल्या अनुभवांमुळे उत्तम विचारशक्तीमुळे (Judgment) आणि प्रतिष्ठेमुळे बाहेरील डायरेक्टर्सचा स्वतःचा स्टॉक (Stock) असू शकतो पण ते काही मोठे शेअरधारक नसतात. गुंतवणूकदार अशा कंपनीकडे जास्त आकर्षित होतात जेथे बाहेरील बोर्ड ऑफ डायरेक्टरची संख्या जास्त आहे.
मार्केटची रचना (Market Design):-
मूळ मार्केटची रचना कंपनीच्या प्रोव्हिजन ऑफ कंपनीस ऍक्ट १९५६ मध्ये नमूद केली आहे. मूळ मार्केट शेअर प्रसिद्ध (Issues) करणे, शेअरची यादी (Listing) करणे आणि त्यांची विभागणी करणे हि कामे करते. कंपनीची रचना सेबी (SEBI) च्या (DIP) गइडलाईन च्या अंतर्गत प्रसिद्ध करणारा (Issuer), संस्थापक (Promotors), संचालक (Management), प्रकल्प, धोक्याच्या बाबी (Risk Factors), योग्यतेचे नमुने या सर्व धोरणाप्रमाणे असायला हवे.
कंपनीच्या पात्रतेचे नमुने (Eligibility Norms):-
कंपनी जी पब्लिक शेअर प्रसिद्ध करू इच्चीते तिला रजिस्ट्रार ऑफ कंपनी (ROC) ला २१ दिवसा आधी उद्देशपत्रिका जमा करावी लागते. नंतर योग्य मर्चन्ट बँक मार्फेत (SEBI) कडे उद्देशपत्रिकेचे दस्तावेज जमा करावे लागतात.
अनलिस्टेड कंपनी, इक्विटी शेअर अथवा दुसऱ्या सेक्यूरीटी ज्याचे पुन्हा इक्विटी शेअर मध्ये रूपांतर होऊ शकते, त्या स्थिर कंपनीवर अथवा वितरणाच्या आगाऊ बांधणी (Book Building Basis) वर प्रसिद्ध करू शकते परंतु त्यासाठी त्यांनी पुढील अटी पूर्ण कराव्या लागतात.
१. कंपनीच्या शेअर प्रसिद्ध (Issues) करण्याच्या पाच वर्षांमागील आधीच्या दोन वर्षी (Preceding) कंपनीची निव्वळ किंमत (Net Worth) कमीत कमी ५ करोड असली पाहिजे आणि बाकीच्या कोणत्याही एका वर्षात कंपनीची निव्वळ किंमत ५ करोडपेक्षा कमी नसली पाहिजे.
२. कंपनीस ACT १९५६ कलम २०५ मध्ये कंपनीची डिस्ट्रीब्युटेबल नफ्याचा (Distributable Profits) ट्रेक रेकॉर्ड आधीच्या ५ वर्षातून कमीतकमी ३ वर्षी तरी चांगला असावा.
३. इश्यू साईझ हि ऑफर डॉक्युमेंट (Offer Document) + Firm Allotment + व्यवस्थापकाचे योगदान) कंपनीच्या निव्वळ किमतीपेक्षा (Net Worth) ५ पटीने जास्त नसली पाहिजे.
कंपनीच्या संस्थापकाला हातभार (Contribution of Promotors):-
अनलिस्टेड कंपनीच्या पब्लिक इश्यू मधील व्यवस्थापकाचे (promotors) योगदान (contribution) आणि जेव्हा शेअरची विक्री केली जाते तेव्हा व्यवस्थापकांचे शेअर होल्डिंग पोस्ट इश्यू भांडवलपेक्षा २०% हुन कमी नसले पाहिजे.
काळाचे बंधन (Lock-In Period):-
लोकांमध्ये कंपनीने शेअर इश्यू केल्यावर व्यवस्थापकाचे योगदान कमीतकमी ३ वर्षांसाठी बद्ध (Locked) होते. जर व्यवस्थापकाचे योगदान गरजेपेक्षा जास्त झाले तर ते जास्तीचे योगदान १ वर्षासाठी बद्ध (Locked) होते. ज्या सेक्यूरीटी फर्म ऑलॉटमेंटच्या (Securities allotment firm) बेसिस (basis) वर असतात त्यांचा बद्धकाळ १ वर्षाचा असतो.
वितरणाची आगाऊ बांधणी (Book Building Process):-
या पद्धतीत सेक्युरीटीचे वितरण केले जाते. ज्यात गुंतवणूकदार शेअर मार्केटच्या सभासदांमार्फत शेअर च्या किमतीवरची जी बोली (Bids) लावतात ती आखली जाते. गुंतवणूकदारांनी लावलेली बोली बुक बिल्डिंग हा यांचा पाय आहे. सेक्युरीटीला दिलेल्या मागणी प्रमाणे कराची आकारणी केली जाते आणि मग किंमत ठरवली जाते. सामान्य पब्लिक इश्यु मध्ये गुंतवणूकदाराला किंमत अगोदरच ठाउक असते आणि मागणी (Demand) शेअरचे वितरण (Issue) बंद झाल्यावर कळते.
बँकर इश्यु (Banker to Issue):-
पेमेन्ट झालेल्या IPO चा अर्जाना एकत्र करण्याचे काम ठरवलेली शेड्युल बँक करते. बँकेची कामे पुढील प्रमाणे
१. अर्जपत्र चौकशी करून स्वीकारतात आणि त्याच बरोबर त्यांची पेमेन्ट हि स्वीकारतात.
२. ज्या अर्जदारांनी विभागणी (allotment) मिळत नाही अथवा अपूर्ण विभागणी (part allotment) मिळते त्यांना त्यांचे पैसे परत देते.
३. नफ्याच्या हिस्स्याची (Dividend) पेमेन्ट करते.
४. शेड्युल बँकला सर्व भारतात जेथील त्यांच्या शाखा पेमेन्ट स्वीकारतात त्यांची यादी आणि दररोजचा अर्ज (daily application) आणि पेमेन्टचा रिपोर्ट कंपनीला द्यावा लागतो.
रेजिस्ट्रार टू इश्यु (Registrar To Issue):-
हे सामान्यता कंपनीच्यावतीने खालील कार्य करतात त्यांची कार्य पुढील प्रमाणे
१. अर्जदार आणि त्यांचे पैशांचे अकाउंट सांभाळणे.
२. वितरणाच्या आगाऊ बांधणीचा कार्यभार अद्यावत करणे आणि विभागणीची यादी करणे.
३. विभागणी मिळालेल्या लोकांना त्यांचे पत्र पाठवणे.
लीड मर्चंड बँकर (Lead Merchant Bankers):-
कंपनीचे कर्त्यव्य पार पाडण्यात मर्चंड बँक महत्वाची कामगिरी बजावते. ते दक्षतेने पाहतात कि, ऑफर डॉक्युमेंट सेबीच्या गाईडलाइन प्रमाणे आहेत कि नाही, तसेच शेअर्सची डिमांड कमी भरली गेली तर ते स्वतःचे भांडवल बाकीची रक्कम भरून काढण्यासाठी करतात.
IPO ला अर्ज कसा करावा (How to Apply for IPO):-
प्रथम तुमच्याजवळ पॅन कार्ड (pan card) असणे आवश्यक आहे. आणि आधार कार्ड असणे सुद्धा आवश्यक आहे, ते डिमॅट अकाउंट चालू करण्यासाठी आवश्यक आहे. डिमॅट अकाउंट उघडल्या नंतर आपण IPO ला अर्ज करू शकतो.
IPO मध्ये गुंतवणूक करण्याआधी लक्षात घेण्याचे मुद्दे (Points to be checked before Investment in IPO):-
१. कंपनीचे व्यवस्थापन कसे आहे? ते योग्य आहे कि नाही? कंपनी केव्हा सुरु झाली? ह्या सर्व गोष्टी बघावे लागणार.
२. कंपनीचे प्रकल्प, जमीन, मशिनरी, कच्चा माल, विक्रीची व्यवस्था यावर लक्ष दिले पाहिजे.
३. कंपनीचे एकूण भांडवल किती आहे आणि कंपनी त्यात वाढ करणार आहे कि नाही ते सुद्धा तपासले पाहिजे.
४. कंपनीतील टेकनिकल कॉलॅबोरेशन आहेत का? तसेच विदेशी माहिती वगैरे पाहाव्यात.
५. सरकारने उत्पन्नावरील कर, विक्रीकर, एक्साईज ड्युटी, यात काही सूट दिली आहे का ते बघावे.
६. विक्रीचे व्यवस्थापन आणि वस्तूची मागणी देशातच आहे कि विदेशी सुद्धा आहे हे पाहावे.
जर वरील मुद्दे काळजीपूर्वक अभ्यासले तर तेथे अर्ज केल्यानंतर काही समस्या येत नाही.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे हे कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका.
शेअर बाजाराविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही मला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
Mob no. 9664337836
धन्यवाद.