Technical Analysis Basic Part 2

Vivek Investment > Marathi > Technical Analysis Basic Part 2

          आपण मागच्या ब्लॉग मध्ये Technical Analysis ची सुरवात कशी झाली हे पाहिले आणि JAPANESE CANDLESTIC चा इतिहास सुद्धा पाहिला. ज्या गुंतवणूकदारांनी Technical Analysis चा पहिला भाग वाचला नसेल तर त्यांनी तो नंतर वाचावा

             Technical Analysis  मध्ये चार्ट्स (Charts) चा उपयोग करून किंमत (Price) आणि वोल्युम (Volume) चा मागच्या (Past) मुहमेंटचा विश्लेषण (Analysis) केले जाते आणि त्यांच्या मदतीने त्या शेअर्सची मागणी आणि पुरवठा (Demand & Supply) समजून त्या शेअर ची पुढची भविष्यवाणी (Future Prediction) केले जाते

Technical Analysis  चा उपयोग Short Term मध्ये शेअर्सची भविष्यवाणी (Prediction) करण्यासाठी होतो. Technical Analysis काय असत हे आपण उदाहरण मधून बघुया

जेव्हा कुठली परीक्षा असते Board Exam, Graduation exam . तेव्हा खूपसारे विद्यार्थी  मागच्या काही वर्षांचे प्रश्नपत्रिका (Question paper) गोळा करतात आणि त्यांचे विश्लेषण (Analysis) करतात. जसे कुठलाही प्रश्न मागच्या चार वर्षात लागोपाठ विचारला जात असेल तर ते विद्यार्थी  तो प्रश्न खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करतात कारण त्यांना असं वाटत असत हा प्रश्न मागच्या चार वर्षात सतत विचारला आहे तर या वर्षी पण हाच प्रश्न विचारला जाईल. खुपसारे विद्यार्थी  याच प्रकारे मागच्या प्रश्नपत्रिकांचे अभ्यास करून जातात आणि कधीतरी हे प्रश्न सुद्धा परत विचारले जातात पण कधी कधी हे प्रश्न परत विचारले जात नाही आणि असे प्रश्न विचारले जातात कि हे आधी कधीच प्रश्न विचारले गेले नव्हते. हि जी  टेकनिक आहे ती शेअर मार्केट मध्ये Technical  Analysis चा पाया आहे. शेअर मार्केट मध्ये प्रश्नपत्रिकांच्या बदल्यात शेअर ची किंमत (Price) आणि वोल्युम (Volume) चा भूतकाळाचा विश्लेषण (Analysis) केले जाते यांच्या मदतीने  शेअर्स ची पुढची भविष्यवाणी केली जाते.   Technical Analysis हे असं गृहीत धरतो कि इतिहास (History) हा पुन्हा पुन्हा समोर येते. म्हणजे जी घटना घडून गेली आहे ती पुन्हा घडते आणि हीच Technical Analysis ची मर्यादा आहे. कारण आपल्याला माहित आहे “Change is  the Law of Universe” म्हणजेबदल हा सृष्टीचा नियम आहे “. काही काही वेळेस इतिहास हा परत घडत नसतो

           गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स यांच्या भावना (Emotions) चा सुद्धा मार्केट वर परिणाम असतो. मार्केटच्या असमंजसपणा चे (Irrational) मोजमाप करण्यासाठी Technical Analysis चा उपयोग केला जातो. Technical Analysis  फक्त दोन गोष्टी बघतो किंमत (price) वोल्युम (volume) हे दोन्ही पण नंबर आहेत म्हणून आपण असं पण म्हणूशकतो कि “Technical Analysis is all about number”. Technical Analysis मध्ये चार्ट चा उपयोग करून price आणि volume विश्लेषण (analysis) केलं जात

        पुढच्या ब्लॉग मधे आपण Chart चे प्रकार पाहणार आहोत आणि हळू हळू यांची पूर्ण माहिती घेणार आहोत

       आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं हे कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका

        शेअर मार्केट विषयी अधिक माहिती साठी तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता

धन्यवाद

                       

Leave a Reply

×