तुमच्याकडे LIC  पॉलिसि आहे का?अदानिंमुळे तुमचे पैसे बुडणार का?

Vivek Investment > Marathi > तुमच्याकडे LIC  पॉलिसि आहे का?अदानिंमुळे तुमचे पैसे बुडणार का?

तुमच्यकडे LIC ची पॉलीसी असेल आणि अदानीबाबत हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे तुम्हाला असे वाटत असेल कि माझ्या पॉलीसीचे पैसे बुडतील का? LIC अदानी समूहातील गुंतवणूक किती सुरक्षित आहे?  

याबद्दल सगळी माहिती जाणून घेऊया.

           हिंडेनबर्ग रिपोर्ट नंतर गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली. अदानी समूहात ज्यांनी गुंतवणूक केली त्यांना प्रचंड नुकसान झाले आहे. यात वैयक्तिक गुंतवणूकदारांसोबत संस्थात्मक गुंतवणूकदारांचा देखील समावेश आहे. आता ज्या अर्थी LIC ने अदानी समूहात मोठी गुंतवणूक केली आहे त्या अर्थी त्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे आणि या मुळेच LIC पॉलीसी धारकांनमध्ये काळजीचे वातावरण तयार झाले.  

LIC पॉलीसी असलेले एकाच प्रश्न विचारू लागले.

. आम्ही पॉलीसीमध्ये गुंतवलेले पैसे बुडतील का

. अदाणींमुळे आमचे पैसे वाया जातील का

. आम्ही घेतलेली पॉलीसि वाया जाईल का?

असे अनेक प्रश्न लोक विचारात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर काय आहेत ते समजून घेऊया

अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग कंपनी हिंडेनबर्ग २४ जानेवारीला एक रिपोर्ट प्रसिद्ध करते. या रिपोर्टमध्ये अदानी समूहावर गंभीर आरोप लावण्यात आले होते. अदानी समूहाने स्वतःच्या खात्यात अनेक हेरफेर केले आहेत. अदानी समूहाने स्वतःच्या कंपन्यांचे शेअर्स ओव्हर प्राईस करून दाखवले आहे. या रिपोर्ट मध्ये अदाणीसमूहाला ८८ प्रश्न विचारण्यात आले होते. या काळात अदाणीसमूहाचे शेअर्स मोठी घसरण झाली. फक्त १० दिवसात अदानीयांना लाख कोटी पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यामुळे अदानी समूहात गुंतवणूक केलेल्या लोकांची काळजी वाढली. देशातील सर्वात मोठी विमा कंपनीने अदाणीसमूहात मोठी गुंतवणूक केली आहे. इतरांप्रमाणे LIC चे देखील नुकसान झाले आहे. मात्र हि गुंतवणूक मोठी असल्याने नुकसान देखील मोठे आहे

 

LIC खरंच बुडणार का?

LIC ने अडणीसमूहात ३६ हजार ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अदाणीसमूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीच्या एलआयसीच्या कमाईवर नक्कीच परिणाम झाला आहे. पण हे नुकसान इतके मोठे आहे कि LIC बुडेल? जर शेअर्सच्या किमतीमधील चढउताराने कंपन्या बुडाल्या असत्या तर रोज हजारो कंपन्या बुडाल्या असत्या. एलआयसीने देखील स्पष्ट केले आहे कि अदानी प्रकरणात घाबरण्याची गरज नाही. एलआयसीची एकूण संपत्ती ४१.६६ लाख कोटींहून अधिक आहे. याचा अर्थ अदाणीसमूहातील त्यांची गुंतवणूक टक्क्यांपेक्षा कमी आहे. व्यक्ती किंवा संस्था यांना तोपरीयंत नुकसान होत नाही जोपरियंत ते स्वतःकडील शेअर्स विकत नाही. जेव्हा तुम्ही शेअर्स विकता तेव्हा फायदा किंवा तोट्याचा प्रश्न येतो. एलआयसीने आता अदानींचे कोणतेही शेअर्स विकले नाही त्यामुळे आता तोटा किती झाला किंवा किती होत आहे याची चर्चा करण्याचा प्रश्न येत नाही

            जेव्हा कोणतीही व्यक्ती पॉलीसी खरेदी करते तेव्हा तुम्ही दिलेल्या हफ्त्यातून जमा झालेले पैसे विमा कंपनी मार्केटमध्ये गुंतवतात. तेथून झालेल्या फायद्यातून तुमचे क्लेम दिले जातात. विमा कंपन्यांचा क्लेम परत करण्याचा वेग कमी असल्यामुळे ते मार्केटमध्ये दीर्घ काळाचा विचार करून गुंतवणूक करतात. याच एका कारणांमुळे विमा कंपन्यांचा नेहमी हा प्रयत्न असतो कि तुम्ही मोठ्या कालावधीचा विमा घ्यावा तुमचे आयुष्य दीर्घकाळ असावे. जितके दिवस तुमचा पैसा विमा कंपनीकडे असेल तितके दिवस ते या पैशातून कमाई करतात.

           LICने अदानी समुहाशिवाय अन्य अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. LIC ने शेअर बाजारातील ३६ कंपन्यांमध्ये १० लाख कोटींहून अधिक रक्कम गुंतवली आहे. जर अदाणीसमूहातील त्यांच्या गुंतवणुकीतीची तुलना केली तर ती टक्क्यांपेक्षा कमी आहे. २० सप्टेंबर २०२२ परियंत एकूण AUM अर्थात असेट अंडर मॅनेजमेन्ट (Assets under management) ४१ लाख ६६ हजार कोटी इतकी होते.  AUM म्हणजे विमा कंपन्या हा पैसे बाजारात मॅनेज करतात. अदानी मधील LICची गुंतवणूक ३६ हजार ४५० कोटी आहे. जी त्यांच्या एकूण गुंतवणुकीच्या टक्क्यांपेक्षा कमी आहे. गुंतवणूक जेवढी कमी धोका तेव्हडा कमी

              एलआयसीने स्पष्टपणे म्हंटले आहे कि, गुंतवणुकीसाठी संस्थांसाठी निश्तित केलेल्या रिस्क मॅनॅजमेण्ट फ्रेमवर्कच्या आतच हि गुंतवणूक केली आहे. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनॅजमेण्टचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी वृत्त संस्था ANI शी बोलताना सांगितले कि  एलआयसीच्या गुंतवणुकीबाबत आता घाबरण्याची गरज नाही. त्यांची गुंतवणूक सुरक्षित आहे

एलआयसी एका सुरक्षित सेक्युरिटीजच्या अंतर्गत येतेत्यांच्याकडे रेटेड बॉण्ड्स आणि इक्वीटी आहेत. ते एका सुरक्षित धोरणांनुसार गुंतवणूक करतात. गुंतवणूक केलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चढउतार नेहमीच पाहायला मिळतोयाचा परिणाम विमा धारकांना होताना दिसत नाहीएलआयसीने एक पब्लिक नोट प्रसिद्ध केली आहेज्यात आजच्या तारखेला त्यांच्या गुंतवणुकीची व्हॅल्यू सांगितली आहे. आता फक्त अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे कमाईवर परिणाम होत आहे. जर तुमच्याकडे LIC पॉलिसी असेल तर काळजी करण्याचे कारण नाही

अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एलआयसीच्या (LIC) विमाधारकांनी अदानी प्रकरणावरून घाबरण्याची गरज नाही. आम्हाला अपेक्षा आहे कि तुम्हाला याबाबत सर्व समस्या दूर झाल्या असतील तर हा लेख तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करा

धन्यवाद.   

Leave a Reply

×