मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?

Vivek Investment > Marathi > मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?

मुहूर्त म्हणजे खूप चांगला दिवस. मुहूर्त ट्रेडिंग एक विशेष ट्रेडिंग सेशन (सत्र ) असत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर “लक्ष्मीपूजन”च्या दिवशी असते. मुहूर्त ट्रेडिंग सेशन (सत्र) “लक्ष्मीपूजनच्या ” दिवशी सायंकाळी असते, पण ह्याचे फिक्स वेळ ठरवलेली नसते. मागच्या वर्षी म्हणजे २०१९ ला मुहूर्त ट्रेडिंग सेशन (सत्र) सायंकाळी ६:३० ते ७:३० च्या दरम्यान ठेवले होते. दर वर्षी मुहूर्त ट्रेडिंगच्या काही दिवस आधी स्टॉक एक्सचेंज मुहूर्त ट्रेडिंग चे टाईमिंग (वेळ) जाहीर करते. “लक्ष्मीपूजन” शनिवारी किंवा रविवारी येत असेल तरी सुद्धा मुहूर्त ट्रेडिंगची व्यवस्था केली जाते.

या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग सेशन (सत्र) १४ नोव्हेंबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी ठेवले आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी माणस लक्ष्मीदेवीची पूजा करतात कारण ती “धन” आणि “समृद्धीची” देवता आहे. लक्ष्मीपूजनच्या दिवशी नवीन हिंदू आर्थिक वर्ष (Financial Year) चालू होता. लक्ष्मीपूजनच्या मुहूर्ताला माणसं गुंतवणूक करण्यास पसंती दाखवतात आपल्याला माहित आहे कि माणसं या दिवशी सोन-चांदी खरेदी करतात कारण ते शुभ असत म्हणून.

लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्त ट्रेडींगला दीर्घकालीन गुंतवणूकिसाठी (Long TermInvestment) शेअर्स खरेदी करतात. मुहूर्त ट्रेडिंगची प्रथा खूप वर्षांपासून चालत आली आहे. तुम्ही मुहूर्त ट्रेडींगच्या दिवशी गुंतवणूक करत असाल, तर त्या कंपनीची पूर्ण माहिती घेऊन निर्णय घ्या.

हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर कंमेंट जरूर करा.

शेअर बाजारातील गुंतवणूक विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क आणि व्हॅट्सऍप करू शकता.

धन्यवाद.

1 Response

Leave a Reply

×