काल स्टॉक मार्केट जवळपास ३.७६% टाक्यांनी खाली घसरले. मागील १० महिन्यातील ही मोठी घसरण आहे.
स्टॉक मार्केट पडत असताना घाबरून जाण्याऐवजी खंबीर होऊन संधीचा लाभ घेऊ शकता.
वॉरेन बफेंसारखे “व्हॅलयु इन्व्हेस्टर” (दीर्घ काळासाठी गुंतवणूक करणारे) अशा संधीसाठी अतिरिक्त रोख (पैसा) साठवून ठेवतात. कारण हीच ती वेळ असते, जेव्हा चांगल्या कंपनीचे शेअर्स कमी किमतीत विकले जात असतात (उपलब्ध असतात.)
पूर्ण शेअर मार्केट घसरत असल्यामुळे चांगल्या कंपनीच्या शेअर्सची किंमतसुद्धा कोणत्याही कारणाशिवाय खाली येते.
कंपनीच्या बाबतीत ठराविक अशा वाईट गोष्टी घडलेल्या नसतात तरीही शेअर्सची किंमत घसरते. म्हणजे शेअर्स “DISCOUNT RATE” उपलब्ध असतात. अशावेळी आपल्याकडील शेअर्स न विकता कमी किमतीत चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणे फायद्याचे ठरू शकते.
या आधीही अनेकदा मार्केट क्रॅश झाले आहे आणि भविष्यातही होईल, पण मार्केट प्रेत्येक पडझडीतून सावरल आहे.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं हे कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका
शेअर मार्केट गुंतवणूक करायची असल्यास तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता.
धन्यवाद.
खुप छान माहिती आहे….👌🏻👍🏻