प्राथमिक शेअर बाजार हा नवीन सेक्युरिटी आणण्यासाठी चांगला मार्ग आहे. त्यांना आम्ही इनिशिअल पब्लिक ऑफर अथवा सार्वजनिक जाहीर आमंत्रण म्हणतो. त्या बाजारातून नवीन सेक्युरिटीस सरकारी बॉण्ड्स, कॉर्पोरेट बॉण्ड्स वगैरे वितरण होते आणि त्यांच्यामधून त्यांना भांडवल मिळते.
वर्तनामात प्रगतिशील गतिशील अर्थतंत्रमध्ये देशाचा आर्थिक विकास लवकर करण्यासाठी शेअर बाजाराला जरुरी प्रोत्साहन देणे जरुरी आहे आणि शेअर बाजाराला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी नवीन हि येणे जरुरी आहे आणि ते या प्राथमिक शेअरबाजारामार्फत येऊ शकतात..
नवीन कंपनीची किंवा जुन्या प्रस्थापित कंपनीची पुढील वितरणातील समभाग शेअर दोन करोड रुपयांचे आणि त्याचा शेअर १० रुपये या प्रमाणे २० लाख भाग घेतात, आणि ते प्रमोटर आणि जनतेकडे असतात. ह्या १० रुपये दर्शनी किमतीला (Face Value) म्हणतात. जे जनतेमधील IPO द्वारा वितरित होतात. तेव्हा सेबी ची परवानगी घेऊन त्यांची दर्शनी किंमत प्रीमियमभाव मध्य नक्की करून प्राथमिक शेअर बाजारात येते.
आताच्या काळात दर्शनी किंमत साधारणपणे १० रुपये असते आणि पूर्वीच्या वेळी दर्शनी किंमत साधारणपणे १०० रुपये असते.
दर्शनी किंमत दहा रुपये होऊ शकते तसेच दर्शनी किमतीवर कमी पण फिजिकल सर्टिफिकेट वरती मॅच्युरिटी काळ मर्यादा पूर्ण रक्कम लिहिलेली असते आणि ती १०० रुपयांच्या गुणांकात येते. लाभांश रक्कम शेअरच्या दर्शनी किमतीवर मिळते..
प्राथमिक बाजारात शेअरच्या दर्शनी किंमत जादाभारसहित विस्तारित करून येते तर ते प्रीमियममध्ये आले असे म्हणतात. आणि शेअरच्या दर्शनी किमतीवरून कमी भाव असेल तर त्यांना डीसकाउंट शेअर म्हणतात.
सामान्यपणे प्रमोटर्स प्रायवेट लिमिटेड कंपनी बनवतात आणि कामकाज चालूकरून ते बँक आणि फायनांनशिअल कंपनीकडून पैसे घेतात आणि ते पैसे कमी पडतात आणि कामकाज वाढते आणि त्यांना जास्त भांडवलाची गरज पडते ते सेबी ची परवानगी घेऊन I.P.O. मार्फत जनतेकडून भांडवल जमा करते.
१. इनीशियल पब्लिक ऑफर (I.P.O )
२. लिस्टेड कंपनीमार्फत पब्लिक वितरण.
३. राइट वितरण.
जेव्हा अनलिस्टेड कंपनी प्रथम जाहीरमध्ये शेअर विकण्यासाठी घेऊन येतात त्यांना IPO म्हणतात. यांच्यामध्ये सेबीची परवानगी घेऊन प्राथमिक बाजारातून वितरण करू शकतात.
ज्या कंपनीचा कामाचा व्याप वाढतो आणि डेव्हलपमेंटसाठी भांडवलाची गरज पडते तेव्हा ते सेबीची परवानगी घेऊन जनतेत वितरण करू शकतात.
जेव्हा जेव्हा लिस्टेड कंपनीला आपले भांडवल शेकड्यांमध्ये घेऊन वाढवायचे आहे तर ते राइट इशुला प्राध्यान्य देतात. आणि त्या मध्ये प्रथम हक्क शेअर होल्डर ला मिळतो. यामध्ये कंपनीचे व्यवस्थापक प्रत्येक शेअर होल्डरला नोटीस पाठवतात. हि नोटीस पाठवल्यानंतर १५ दिवसांचं वेळ शेअर होल्डरला द्यावा लागतो. या दिवसात त्यांना शेअर घ्येयचे आहेत कि नाही हे ठरवावे लागते.
विचार करा कि एका कंपनीची भांडवलाची गरज २ करोड रुपयांची आहे आणि त्यांना १ करोड रुपयांच्या भांडवलाची गरज भागली तेव्हा ते दोन शेअर एका शेअरच्या प्रमाणात शेअर होल्डरला दिले तर १ करोड रुपयांचे भांडवल उभे राहू शकते.
समजा कि कंपनीचा मार्केट भाव दर्शनी किमतीपेक्षा फार जास्त आहे तर कंपनीचे व्यवस्थापक जादाभार प्रीमियम घेऊन ते शेअर होल्डरला ऑफर करतात. तेव्हा त्यांचे प्रमाण बदलणार आणि दोन शेअरच्या बदली एक शेअर न घेता ते चार शेअरवर एक राइट शेअर देणार.
उदा. एका कंपनीला एक करोडची गरज आहे आणि पन्नास लाख रुपये प्रीमियममधून घेतले तर त्यांचे प्रमाण चार शेअर समोर एक राईट शेअर होतो.
राईट शेअरचा भाव मार्केटभाव पेक्षा जास्त कमी झाला तरी दर्शनी भाव आणि मार्केट शेअरचा भावामध्ये जास्त फरक नाही राहिला तर शेअर होल्डरला ते खरेदी करता येत नाही..
जेव्हा कंपनी द्वारा शेअर वितरण होतात, त्या भावाला ईश्यु प्राइज म्हणतात. लिस्ट झाल्यावर त्यांचा भाव तेवढाच किंवा कमी होतो त्यांना बाजारभाव असे म्हणतात.
बुक बिल्डिंग प्रोसेसमध्ये कंपनी जेव्हा इश्यु आणते तेव्हा तेव्हा त्यांना प्रोसपेक्टमध्ये बँड द्यावा लागतो म्हणून ईश्यूची कमीत कमी प्राइज आणि जास्तीत जास्त प्राइज होणे यांना प्राईज बँड म्हणतात. त्यांच्यामध्ये जे भाव नक्की होतो त्यांना कट ऑफ प्राइज म्हणतात दुसऱ्या शब्दात त्यांना इश्यू प्राइज प्रमोटर्स आणि लिड मॅनेजर म्हणतात. बुक बिल्डिंग प्रोसेस झाल्या नंतर गुंतवणुकीच्या मागणी प्रमाणे नक्की करतात.
बुक बिल्डिंग प्रोसेसमध्ये गुंतवणूकदार कमीत कमी भावात जी बोली लावतात त्यांना फ्लोर प्राइज असे म्हणतात.
प्रॉस्पेक्टसमध्ये फ्लोर प्राइज किंवा जास्तीत जास्त बोलीच्या भावाला प्राइज बँड म्हणतात. गुंतवणूकदार त्यांच्या प्राइज बँड मधेच बोली लावू शकतात. त्यांच्यामध्ये वरच्या आणि खालच्या भावामध्ये जास्तीत जास्त फक्त २०%चा फरक असू शकतो.
सेबीचा कायदा आणि धोरण जेव्हा जनतेमध्ये जाहीर होते तेव्हा ते प्रॉस्पेक्टस द्वारे माहिती देते त्यातील मुद्दे पुढील प्रमाणे:-
१. प्रॉस्पेक्ट्स मध्ये महत्वाची माहिती दिलेली असते.
२. संस्थापकाची तपशीलवार माहिती प्रॉस्पेक्टस मध्ये देण्यात येते.
३. कंपनी ज्या वस्तूची उत्पादन करते त्याची भविष्यात भारतीय बाजारात अथवा विदेशी बाजारात होणाऱ्या विक्री विषयी माहिती. दिली जाते.
४. कंपनीतील कच्या मालाची प्राप्ती, भौगोलिक विस्तार, लाइट तसेच वर्तमान उत्पादन शक्ती आणि भविष्यात उत्पादनाची माहिती दिली जाते.
५. सरकारी कर आकारणीतून या उद्योगाला कशी सवलत मिळते त्याची माहिती मिळते.
६. वर्तमानातील विदेशी सहयोग अथवा भविष्यातील विदेशीच्या सहयोगात संभवत वगैरेची माहिती दिली जाते.
वरचे मुद्दे पाहून कंपनीच्या सूक्ष्म माहितीचा अभ्यास करून कंपनी उत्पादन क्षेत्र कसे चालवते त्याची माहिती बघू. साधारणपणे सर्व कंपन्या प्रॉस्पेक्टमध्ये कंपनीची चांगली प्रतिभा दाखवतात पण आपण ह्या सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून त्या कंपनीचे शेअर खरेदी केले पाहिजे.
प्रॉस्पेक्टस मध्ये चुकीची अथवा खोटी माहिती दिली तर तो फौजदारी गुन्हा होतो आणि जर का प्रमोटरने न्यायालया समोर खोटी माहिती दिली तर त्याच्यावर आपण केस करू शकतो..
शेअरची विभागणी झाल्याची अथवा परतफेडीची (Refund) माहिती कशी करून घ्येयची (How to know about Allotment of Shares/ Refund ): सेबी गाइड लाइन प्रमाणे शेअरची विभागणी इश्यु केलेल्या तारखेवर बंद झाल्यानंतर १५ दिवसामध्ये शेअरची विभागणी (Allotment) झाली पाहिजे आणि डिमॅट खात्यामध्ये जमा झाली पाहिजे. विभागणी ना झाल्यास त्याची १५ दिवसांमध्ये इश्यु बंद झाल्याची परतफेड गुंतवणूकदाराला मिळायला पाहिजे.
I.P.O. बंद झाल्यानंतर त्या कंपनीची लिस्टिंग तारीख जाहिराती द्वारे प्रसिद्ध होते. I.P.O. जेव्हा कंपनी इश्यु करते तेव्हा स्टॉक मार्केट मार्फत ज्या दिवसांपासून त्याची बाजारात देवाण घेवाण सुरु होते त्याला लिस्टिंग म्हणतात आणि त्या दिवसापासून कंपनी प्राथमिक शेअर बाजारातून द्वितीय शेअर बाजारात प्रवेश करते. त्या कंपनीचे भाव मार्केटच्या गरजेप्रमाणे तसेच बाहय घटकांच्या परिणामामुळे कमी जास्त होतात.
साधारपणे बुक बिल्डिंग प्रोसेस अथवा साधारण पद्धतीत इश्यु बंद होण्याचा तारखे नंतरचे तीन आठवडे हि लिस्टिंगची मर्यादा आहे.
भारतीय कंपनीला फॉरेन करंसीमध्ये पैसा उभा करण्यासाठी सरकारपासून तीन सवलती मिळाल्या आहेत.
कंपन्या फॉरेन करंसीमध्ये कन्व्हर्टेबल बॉण्ड Convertible Bond Issue करू शकते त्याला सामान्यपणे Euro-Issue असे म्हणतात. कंपनी साधारण शेअर डिपॉजिटरी द्वारे इश्यु करू शकते जसे कि अमेरिकन रिसिप्ट ADR आणि GDR ग्लोबल रिसिप्ट.
सामान्यपणे शेअर फिजिकल सर्टिफीकेट मध्येच असतात आणि तो गुंतवणूक करणाऱ्यांचा मालकी हक्कांचा पुरावा असतो. त्यांना अमेरिकन डिपॉजिटरी शेअर ADS म्हणतात. ADS हा US डॉलरमध्ये असतो आणि ते सामान्यपणे कस्टोडिअन बँक मध्ये जमा असतात आणि त्यांना कंपनीचा कॉर्पोरेट आणि इकॉनॉमिक्स राइट्स उपलब्ध होते. ह्या सर्व अटी ADR सर्टिफिकेटवर दर्शिवितात.
या ADS मध्ये अमेरिकन व्यक्ती अमेरिकेच्या बाहेरील कंपनीच्या शेअरचा खरेदी विक्रीचा व्यवहार अमेरिकेतुनच करू शकते.
ADS डिपॉजिटरी बॉण्ड द्वारा इश्यु होते जसे कि हा शेअर U.S कंपनीच्या शेअरप्रमाणे न्युयॉर्क स्टॉक एक्सचेंज New York Stock Exchange (NYSC),
American Stock Exchange (AMEX), NASDAQ अमेरिकन स्टॉक एक्सचेंज अथवा नासडेक बाजारामध्ये सहज रीतीने देवाण घेवाण करता येते.
हे पण एडीआर ADR समान आहे फरक एवढाच आहे कि ते एका पेक्षा जास्त देशाच्या बाजारामध्ये ऑफर होतात आणि पब्लिक अथवा प्रायव्हेट मार्केट मधूनच त्यांची देवाण घेवाण होते.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका.
शेअर बाजार विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या फेसबुक पेज ला फोल्लोव करा.
शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला कॉल किंवा व्हाटसऍप करू शकता.
धन्यवाद.
खुप छान माहिती आहे. 👌🏻👌🏻👍🏻
Thanks for sharing the
valuable information