पेनी (PENNY) स्टॉक म्हणजे काय?

Vivek Investment > Marathi > पेनी (PENNY) स्टॉक म्हणजे काय?

पेनी स्टॉक म्हणजे ज्या कंपनीची किंमत आणि मार्केट कॅपिटलायझेशन खूप कमी असते. पेनी स्टॉकची अशी एक विशिष्ठ व्याख्या नाही. ज्या कंपन्यांच्या शेअरची   किंमत  २० ते २५ रुपयांपेक्षा कमी असते त्यांनापेनी (PENNY) स्टॉकअसे म्हणतात

खूप सारे गुंतवणूकदार (INVESTOR) आणि ट्रेडर्स असे विचार करतात कि, “जर का मी १०००रु किंमतीचे शेअर्स विकत घेतले तर ५००००रु मध्ये फक्त ५० शेअर्स मिळतील, तसेच जर का मी ते ४ ते ५ रु परियंतचे पेनी स्टॉक विकत घेतले तर ५००००रु मध्ये १० ते १२ हजार शेअर्स मिळतील, म्हणजे शेअर्सची संख्या जास्त मिळेल जर का ४ ते ५ वाला शेअर ८ ते ९ रु. परियन्त जरी गेला तरी मला त्यातून खूप चांगला परतावा (RETURN) मिळेल”पण हे सगळं चुकीचं आहे. कारण पेनी स्टॉक हे चांगले नसतात. इथे मी हे नाही सांगत आहे कि फक्त मोठे किंतेचे शेअर्सच चांगले आहेत. स्टॉक चांगले आहेत कि नाही हे कंपनीवर आणि कंपनीच्या फंडामेंटल (FUNDAMENTAL) वर अवलंबून आहे. पण फक्त किंमत बघून आणि त्या किमतीच्या आधारावर कंपनीचे शेअर्स विकत घेणं चुकीचं आहे

खूप सारे लोक असे समजतात कि जेवढी शेअर्सची किंमत जास्त तेवढी ती कंपनी मोठी आणि शेअर्सची किंमत जेवढी छोटी तेवढी कंपनी छोटी. पण हे असं काहीही नसत

उदा.  MRF  या कंपनीच्या एका शेअर्सची किंमत ८९१०० आहे आणि ICICI  या बँकेची एका शेअरची किंमत ५३५ आहे तर तुम्ही मला सांगूशकता का या दोघांमधील कुठली कंपनी मोठी आहेजर तुमचं उत्तर MRF आहे तर ते चुकीचं आहे. कंपनीच्या शेअर किंमत आणि कंपनीचा आकार (SIZE) मध्ये काहीच देणंघेणं नसत. कंपनीचा आकार (SIZE) हा त्या मार्केट कॅपिटलायझेशनच्या  (MARKET CAPITALIZATION) माध्यमातून कळते.  

मार्केट कॅपिटलायझेशनचा फॉर्मुला आहे:- Price of One Share x No. Share Outstanding. 

MRF च्या एका शेअरची किंमत आहे ८९१०० आणि त्याचे शेअर्स आहेत ४२,४१,१४३. वरती सांगितल्या प्रमाणे मार्केट कॅपिटलायझेशनच्या फॉर्मुला नुसार 

MRF या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन हे ३७,८५५ Cr. एवढं आहे. तसेच 

ICICI या बँकेचे एका शेअरची किंमत ५३५ आहे आणि त्याचे शेअर्स ६९०,३६,९३,५२७ आहेत. तर ICICI  बँकेचे मार्केट कॅपिटलायझेशन हे  वरती सांगितलेल्या फॉर्मुलानुसार  ३,६९,३४७ Cr. एवढं आहे.

म्हणजे  MRF या कंपनीची शेअरची किंमत ICICI बँकेपेक्षा खूप पटीने जास्त आहे तरी सुद्धा ICICI बँकेचा आकार (SIZE) हा MRF कंपनी पेक्षा खूप जास्त आहे. म्हणून कंपनीच्या शेअर किंमतीपेक्षा कंपनीचा आकार (SIZE) फंडामेंटल, टाळेबंद (BALANCE SHEET) या गोष्टींवर आपलं लक्ष असलाच पाहिजे

जर तुम्हालापेनी स्टॉकविकत घेयचा असेल, तर तो स्टॉक पेनी स्टॉक का आहे याचा विचार करा आणि त्याच सोबत कंपनीची पार्श्वभूमी (BACKGROUND), फंडामेंटल, त्याच उत्पादन या सर्व गोष्टींचा अभ्यास करायला हवा. काही पेनी स्टॉक तर असे असतात कि ते जर तुम्ही विकायला गेलात तर ते विकले जात नाहीत कारण त्यांचे शेअर्स विकत घेणारे जास्त कोणी नसत

पेनी स्टॉक मध्ये ट्रेडिंग करतेवेळी खूप सावधानता बाळगावी लागते, कारण त्याच्या वेळेला (TIMMING) खूप महत्व असते त्या ट्रेडिंग वेळेत तरलता (LIQUIDITY) कमी असते तो  ट्रेड तुमचा पूर्ण होणार नाही. पेनी स्टॉक मध्ये गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करतेवेळी तरलता (LIQUIDITY) वर सुद्धा लक्ष दिले पाहिजे. काही पेनी स्टॉक तर असे असतात कि तुमच्या छोट्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले परतावे (RETURNS) देऊ शकतात

भारतातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारश्री राकेश झुनझुनवालायांनी टायटन (TITAN) कंपनी जी आजचीदागिन्यानचीसर्वात मोठा ब्रॅड आहे त्याचे शेअर्स २००२२००३ मध्ये  ते रु. ने विकत घेतले होते आणि आज त्यांची किंमत १४००रु. आहे. त्यांना या कंपनीमधून १२०००% परियंत परतावा मिळाला आहे. याचा अर्थ असा होत नाही कि सगळे पेनी स्टॉक हे पुढे नंतर खूप चांगले परतावे देतील

“पेनी स्टॉक मध्ये चांगले फंडामेंटलचे शेअर्स शोधायचे म्हणजे कोळश्याच्या खाणीत “हिरा” शोधण्यासारखे आहे”. आणि जर का तुम्ही हिऱ्याच्या ऐवजी कोळसा घेतला तर तुमची गुंतवणूक रक्कम कोळसा बनायला वेळ लागणार नाही. 

खूप साऱ्या पेनी स्टॉक कंपनी ह्या छोट्या असतात आणि त्यांची कंपनीची माहिती लवकर मिळत नाही म्हणून त्यांचा अभ्यास कारण खूप अवघड असते

पेनी स्टॉकची किंमत हि मार्केट कॅपिटलायझेशन आणि कमी तरलतामुळे (LIQUIDITY) अनधिकृत ट्रेडिंग होते म्हणजे त्याला “PUMP & DUMP” असे म्हणतात

PUMP & DUMP काय असते? हे आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत

एक गोष्ट लक्षात ठेवा खूप कमी पेनी स्टॉक मध्ये चांगले परतावा देण्याची क्षमता असते. जो परियन्त तुम्हाला शेअर बाजाराचा चांगला अनुभव येत नाही तो परियन्त पेनी स्टॉक पासून लांब राहिलेलं बर, शक्य असल्यास लांब राहिलेलं खूप चांगलं. जर तुम्हाला पेनी स्टॉक मध्ये गुंतवणूक करायची असेल तर खूप छोटी रक्कम गुंतवावी

            आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका

            शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला कॉल किंवा व्हाटसऍप करू शकता 

            no. ९६६४३३७८३६

 

   धन्यवाद. 

3 Responses

Leave a Reply

×