आजचा ब्लॉग आपण ELECTRIC VEHICLE बद्दल माहिती घेणार आहोत . ELECTRIC VEHICLE आल्यानंतर आपल्याला काय फायदा असणार आणि त्याच सोबत कोणत्या कंपनी फायदेशीर आहेत ते आपण आज पाहणार आहोत. दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी ELECTRIC VEHICLE चे कुठले शेअर्स विकत घेयचे हे आज आपण या ब्लॉग च्या माध्यमातून पाहणार आहोत.
सर्वप्रथम ELECTRIC VEHICLE कारचे फायदे काय आहेत ते बघणार आहोत. जेव्हा ELECTRIC CAR विकत घेऊ तेव्हा तिचा देखभाल (Maintenance) चा खर्च खूप कमी असतो. आत्ताच्या डिझेल, पेट्रोलच्या गाड्यांचा जो खर्च आहे त्यापेक्षा खूप कमी खर्च ह्या ELECTRIC CAR ला असणार आहे. ELECTRIC CAR मुळे प्रदूषण पण खूप कमी होणार आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये आपल्याला डिझेल पेट्रोल वर अवलंबून राहावं लागणार नाही.
आता आपण पाहणार आहोत ELECTRIC CAR चे कोणते शेअर्स आहेत जे आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळात जास्त परतावा मिळवून देईल.
1: Amara Raja Batteries Ltd:-
बॅट्रीच्या इंडस्ट्रीमध्ये हि कंपनी सर्वोत्तम आहे. ह्याचा आजची किंमत ८००रु. आहे हा शेअर १२३०रु परियंत गेला होता. हि कंपनी बॅट्री बनवण्याचे काम करते. इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी बॅट्रीचा उपयोग होतो. भविष्यात या कंपनीला बॅट्री बनवण्याचे काम मिळू शकते आणि त्याच प्रमाणे ह्या कंपनीच्या शेअर्सची किंमत सुद्धा वाढताना दिसू शकते. ह्या कंपनीने फेब्रूवारी २०२१ या महिन्यात ५ रु डिव्हिडंड (Dividend) दिला आहे.
2: Motherson Sumi Systems Ltd.:-
हि कंपनी ऑटो पार्टस बनवते इलेक्ट्रिक कार जेव्हा बाजारात येईल तेव्हा या कंपनीला मोठे काम मिळूशकते. ह्या कंपनीच्या शेअर ची किंमत २३५ रु चालू आहे. हा शेअर २६० रु परीयंत जाऊन आला आहे. जेव्हा इलेक्ट्रिक कार रस्त्यावर धावायला लागेल तेव्हा या शेअर्सची किंमत सुद्धा वाढलेली दिसेल.
3: Exide Industries Ltd.:-
हि कंपनी बॅट्री बनवण्याचे काम करते ह्या कंपनीने मागच्या काही वर्षांमध्ये डिव्हिडंड दिला आहे. फेब्रूवारी २०२१ मध्ये २ रु डिव्हिडंड दिला आहे. ह्या कंपनीमधे तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक करू शकता. ह्या शेअरची किंमत १८५ रु चालू आहे. हा शेअर ३०० रु परियन्त जाऊन आला आहे.
4: Tata Power Company Ltd.:-
हि कंपनी पॉवर ट्रान्समिशन च काम करते. आता जेव्हा इलेक्ट्रिक कार येतील तेव्हा चार्जिंग स्टेशनची गरज लागेल, तेव्हा ते काम Tata Power करू शकते. तेव्हा हि कंपनी सुद्धा वेगाने वाढू शकते आणि त्याच बरोबर ह्या कंपनीचे शेअर्स ची किंमत सुद्धा वाढू शकते. ह्या शेअरची किंमत आज १०५ रु आहे. अगदी कमी किमती मध्ये हा शेअर उपलब्ध आहे हा शेअर १६० रु वरून खाली आला आहे.
5: Tata Motors.:-
Tata Motors काय काम करते ते तुम्हा आम्हाला सर्वांना माहीतच आहे. हि कंपनी इलेक्ट्रिक कार बनवायला सुरवात केली आहे. ह्या कंपनीच्या शेअर्सची किंमत ३०० रु आहे.
6: Hero MotoCorp Ltd.:-
हि कंपनी दोन चाकी (Two Wheeler) गाड्या बनवते. जेव्हा इलेक्ट्रिक कार बाजारात येतील तेव्हा Two Wheeler सुद्धा इलेक्ट्रिक मध्ये येऊ शकते. Two Wheelers गाड्या बनवण्यात हि कंपनी मोठी आहे. पण सध्या हा शेअर खूप महाग आहे त्याची आजची किंमत २८४० रु एवढी आहे. ह्या कंपनीने फेब्रुवारी २०२१ मध्ये ६५ रु डिव्हिडंड (Dividend) दिला आहे.
7: Mahindra &Mahindra:-
सगळ्या गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओ मध्ये हि कंपनी असतेच असते. ह्या कंपनी ने इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी ४००० करोड रुपये गुंतवले आहेत. हा शेअर आज तुम्हाला ७६० रु ला मिळत आहे. ह्या कंपनी ने इलेक्ट्रिक कार बनवली तर ह्या शेअर ची किंमत ३००० ते ४००० रुपये परियंत जाऊ शकते. हि कंपनी २.५ रु डिविडेंड देते.
तुम्हाला जर डिविडेंड पाहिजे असेल तर या डिविडेंड देणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स तुम्ही विकत घेऊ शकता. पण यात अट अशी आहे तुम्हाला जर असं वाटत असेल कि या सात कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली तर आम्हाला चांगले परतावा (Returns) मिळतील पण हे परतावा लगेच मिळणार नाही. कारण सध्या “कोरोना” चा काळ चालू आहे आणि Electric Vehicle येयला किती वर्ष लागू शकतील हे कोणीच सांगू शकत नाही. लवकरात लवकर ह्या गाड्या येऊ हि शकतात. जेव्हा या गाड्या मार्केट मध्ये येतील तेव्हा त्यांच्या रिलेटेड काम करणारे जेवढे कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये चांगली तेजी बघायला मिळेल.
तुम्ही ह्या कंपन्यांमध्ये आत्तापासून छोटी–छोटी गुंतवणूक करू शकता. “ गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला एकत्र लाखो रुपये गुंतवणूक करण्याची गरज नाही तुम्ही SIP च्या माध्यमातून ह्यात गुंतवणूक करू शकता. तुम्हाला ह्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असल्यास महिन्याला २००० ते ३००० रुपये या सर्व कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता “.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं हे कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका.
शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही मला खाली दिलेल्या नंबर वर व्हाट्सअप आणि कॉल करू शकता.
No 9664337836.
धन्यवाद.
खूप छान. . .👍
महत्वपूर्ण माहिती दिलीस भावा 👍🏻