गुंतवणूक महत्व

Vivek Investment > Marathi > गुंतवणूक महत्व

नमस्कार विवेक इन्व्हेस्टमेंट च्या माध्यमातून आपण गुंतवणुकीचे महत्व बघणार आहोत.

आपण आपले आयुष्य जगताना भविष्य कशाप्रकारे सुरक्षित व चांगल्याप्रकारे जगता येईल यासाठी आपण नेहमी प्रयत्न करत असतो. त्या दृष्टिकोनातून आपण करत असलेल्या मेहनतीतून आपल्याला जे उत्पन्न मिळते त्या उत्पनातील काही पैसे बचत करून आपण ते पैसे बँकेत ठेवतो किंवा त्या पैशाची आपण बँकेत F.D करून ठेवतो. परंतु आज केलेली बचत भविष्यातील येणाऱ्या खर्चांवर मात करेल असा वाटाय का? तर याच उत्तर नाही असा आहे.

आपले भविष्यातील आर्थिक नियोजन व केलेली बचत याचा ताळमेळ बसणं शक्य नाही. आज परीयंतच्या इतिहासाने किंवा आपल्या भूतकाळाने आपल्याला वेळोवेळी दाखवून दिले आहे कि, केलेली बचत भविष्यासाठी कधीही पुरेशी ठरत नाही.. म्हणजेच काय कि आपल्या बचतीचा आणि भविष्यातील महागाईच कधीच पटलेला नाही, तरी माणूस किंवा सर्वसामान्य व्यक्ती या बचतीला महत्व देत आहे. याचे कारण असे आहे कि आर्थिक नियोजन या बाबत आपण कुठेतरी कमी पडत आहोत.

पैशाला पैसा जोडला कि नेहमी पैसा वाढतो परंतु सामान्य व्यक्ती कधीच पैशा ला पैसा जोडत नाही. याचा अर्थ सामान्य व्यक्ती कधीही गुंतवणूक करत नाही आपण फक्त बचत करतो.

“वॉरेन बफेट” यांचं एक उदाहरण आहे ते नेहमी म्हणतात “अगोदर बचत करा व नंतर खर्च करा” पण आपण या उलट करतो, पहिले खर्च करतो व नंतर बचत करतो. तर मित्रानो हे कारण पुरेस नाही. आपल्याला अगोदर बचत करणं शिकवा लागेल त्याच बरोबर ती बचत केलेली रक्कम गुंतवणूक करणे आवश्यक आहे कारण त्या गुंतवणुकीतून मिळणार नफा हा भविष्यकाळातील गरजांसाठी उपयुक्त ठरेल.

गुंतवणुकीचे महत्व तुमच्यात लक्षात आलेच असेल. परंतु तुमच्या समोर एक प्रश्न निर्माण झाला असेल कि तो म्हणजे गुंतवणूक नेमकी करायची तरी कुठे? कशी करायची? कधी करायची? या विषयी सविस्तर माहिती आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत.

जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कंमेंट करायला विसरू नका.

शेअर बाजारातील गुंतवणूक विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क आणि व्हॅट्सऍप करू शकता.

धन्यवाद

3 Responses
  1. Suraj R. Kuvalekar

    खूप छान विचार आहेत आणि ते आपण लोकांपर्यंत पोहचवावेत. जे या बद्दल परिचित नाहीत.

Leave a Reply

×