ओटीटी प्लॅटफॉर्म्स

Vivek Investment > Marathi > ओटीटी प्लॅटफॉर्म्स

OTT म्हणजे “Over-The-Top.”

ओटीटी मीडिया सर्विसेसमध्ये इंटरनेटच्या साहाय्याने चित्रपट, मनोरंजन कार्यक्रम इत्यादी व्हिडीओचे थेट प्रक्षेपण OTT Devices वर केले जाते.

OTT Devices म्हणजे असे कोणतेही उपकरण ज्यांच्या साहाय्याने इंटरनेटशी कनेक्ट होऊन आपण OTT प्लॅटफॉर्म्सवरील व्हिडीओ बघू शकतो उदा. (स्मार्टफोन, लॅपटॉप, अँड्राइड टीव्ही ).

सोप्या शब्दात ओटीटी प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना केबल आणि डिश सेवांवर अवलंबून न राहता इंटरनेट काँनेकशनद्व्यारे टीव्ही शो आणि चित्रपट पाहण्याची संधी देते.

ओटीटी प्लॅटफॉर्म्स चित्रपट/ टीव्ही शोजचे (Show) हक्क विकत घेऊन ते आपल्या प्लॅटफॉर्म्सवर रिलीज आणि प्रक्षेपित करतात.

ओटीटी प्लॅटफॉर्म्स पैसे कसे कमावतात?

ओटीटी प्लॅटफॉर्म्स सबस्क्रिप्शिनच्या (Subscriptions) माध्यमातून सर्वाधिक कमाइ करतात. जेव्हा वापरकर्ते या प्लॅटफॉर्मवरील चित्रपट/ शोज (Shows) बघण्यासाठी पैसे देतात त्याला Subscription म्हणतात. या व्यतिरिक्त व्हिडीओमध्ये किंवा वेबसाइट आणि अँप वर जाहिराती दाखवूनसुद्धा ते पैसे कमावतात. OTT प्लॅटफॉर्म्सवरील वेब-सिरीज हि लोकप्रिय होत आहे.

पारंपरिक केबल, डिश आणि उपग्रहच्या माध्यमातून होणाऱ्या व्हिडीओ प्रक्षेपणाला म्हणजेच पारंपरिक मनोरंजनाला OTT प्लॅटफॉर्म एक पर्याय म्हणून उदयास येत आहे.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका.

शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नो. वर व्हाट्सअप किंवा कॉल करू शकता.

धन्यवाद.

Leave a Reply

×