राकेश झूनझूनवाला यांनी कसे कमावले शेअर मार्केट मधून करोडो रुपये?

Vivek Investment > Marathi > राकेश झूनझूनवाला यांनी कसे कमावले शेअर मार्केट मधून करोडो रुपये?

राकेश झूनझूनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० ला मुंबई मध्ये झाला. ते मुंबई मध्ये वाढले. त्यांचे वडील इनकम टॅक्स ऑफिसर होते. राकेश यांना लहानपणापासून शेअर मार्केटची आवड होती. राकेश यांचे वडील आणि त्यांचे मित्र शेअर मार्केट टॉपिक वर बोलायचे, तेव्हा राकेश फक्त १२ ते १३ वर्षांचे होते, तेव्हा उत्सुकतेने ते त्यांच्या वडिलांना प्रश्न विचारायचे म्हणजे शेअर ची प्राईज कमी जास्त का होते? असे प्रश्न विचारायचे तेव्हा त्यांचे वडील त्यांना प्रप्त्येक प्रश्नांची उत्तरे पूर्ण डिटेलमध्ये देत असत.

राकेश झूनझूनवाला यांनी आपले पदवी परियंतचे शिक्षण मुंबई मधल्या Sydenham College मधून पूर्ण केले. १९८५ ला C.A. पूर्ण केल्यानंतर त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितले कि “मला स्टॉक मार्केट मध्ये करीयर करायचे आहे.” तेव्हा त्यांच्या वडिलांनी तीन ते चार गोष्टी सांगितल्या ते त्यांच्या पुढच्या आयुष्यात उपयोगी पडेल, राकेश यांच्या वडिलांनी त्यांना एवढाच सांगितलं “तु तेच कर ज्यात तुला मजा येईल.” त्यांनी त्याला हे पण सांगितलं “तू माझ्याकडे आणि माझ्या मित्रांकडे पैसे मागण्यासाठी कधीच येऊ नकोस.” तेव्हा राकेश यांच्याकडे ५०००रु. होते. राकेश यांचा भाऊ C.A. ची प्रॅक्टिस करत होता व त्यांच्याकडे एक Client होती. त्या लेडी कडे खूप Capital होते आणि तिला त्या मधून चांगले Return पाहिजे होते. त्यावेळेस बँक डिपोंजीट मध्ये १०% Return मिळत होते. त्यावेळेस राकेश यांनी सांगितले “मि तुम्हाला १८% Return देईन”. अशा पद्धतीने त्या लेडी ने राकेश याना २.५ लाख रुपये दिले. अजून एका व्यक्तीने ५,००,०००रु दिले. अस करून त्यांनी आपला Capital बनवले.

सुरवातीला त्यांनी ट्रेडिंग करून ८ ते १० लाख रुपये कमावले.त्या नंतरचे २-३ वर्ष राकेश यांच्यासाठी कठीण होते. १९८८ ला २.५ लाख सिसागोआचे शेअर्स २८ रुपयांना विकत घेतले होते. आणि अजून ३० रुपयांना २.५ लाख शेअर्स विकत घेतले होते. त्यानंतर ६ महिन्यात सिसागोआ चे शेअर्स ६५रु. परियंत गेली होती.

१९८९ मध्ये “व्ही.पि. सिंग” सरकारने “मधू धनवटे” फायनान्स मिनिस्टर होते. मधू धनवटे यांचे १९८९चे Union Budget राकेश झूनझूनवाला यांचं करियर Turning Point बनला सगळ्या कॉमन Investor पासून ते मोठमोठ्या Market Players परियंत सगळ्यांला असं वाटत होत Mr. Madhu Dhanvate Business वर नाही तर Social गोष्टींवर बजेट असणार, म्हणून मार्केटमध्ये भीती होती आणि सगळेजण मार्केटमध्ये “मंदी” मध्ये होते. तेव्हा राकेश यांना वाटत होत V.P. Singh जे देशाचे पंतप्रधान होते ते ठाकूर होते जे बिझनेस ला खूप चांगल्याप्रकारे ओळखतात त्यामुळे ते बजेट ला कधीच अशाप्रकारे सादर करत नाही जे बिझनेसला Hurt करतील आणि बजेट च्या दिवशी असच झालं जे राकेश यांना पाहिजे होत. मधू धनवटे यांनी खूप चांगल बजेट सादर केलं जे बिझनेसला चांगला सपोर्टिव्ह होत. मधू धनवटे यांच्या बजेटच्या पहिले राकेश यांचा पोर्टफोलिओ २ करोड होत आणि बजेट नंतर ५ महिन्यानंतर पोर्टफोलिओ ४० ते ५० करोड परियंत गेला.

नंतर त्यांनी RARE (रेअर) ENTERPRISES ची स्थापना केली ती एक Asset Management Firm आहे. तेथून ते स्वतःचा Portfolio Manageme करतात. RARE चे पहिले दोन शब्द RAKESH च्या नावाने घेतली आहे आणि नंतरचे दोन शब्द त्यांची बायको REKHA च्या नावाने घेतली आहे.

राकेश यांनी २००२ आणि २००३ मध्ये टायटन (TITAN) कंपनीचे शेअर्स ४.५ रु. ने विकत घेतले, तो शेअर पुढे जाऊन ८०रु. परियंत गेला आणि नंतर ३०रु परियंत खाली घसरला. तेव्हा राकेश यांच्या पोर्टफोलिओची Value ३००cr ने कमी झाली होती पण त्यांनी ३० रु च्या किमतीवर एक पण शेअर नाही विकला कारण त्यांना असं वाटतं होत कि टायटन (TITAN) ची ग्रोथ अजून बाकी आहे आणि आज त्या शेअरची किंमत १५०० रु परियंत आहे. ” असं बोलतात इन्व्हेस्टरकडे पेशंन्स असले पाहिजे.” या उदा. वरून समजते कि शेअर बाजारात पेशंन्स ला किती महत्व आहे. फक्त टायटन नाही अशा खूप साऱ्या कंपन्यांमध्ये पेशंन्स दाखवले आहे

२००५ मध्ये त्यांनी २७ Cr चे Crisil चे शेअर्स विकून मलबार हिल मुंबई मध्ये एक फ्लॅट विकत घेतला. तो फ्लॅट पुढे जाऊन चांगल्या किमतीमध्ये विकला. त्या फ्लॅटचा रेट आज ५० ते ६० Cr. आहे. आणि मी ते Crisil चे २७Cr चे शेअर्स विकले नसते तर त्या शेअर्स ची किंमत ७०० ते ८०० करोड असती.

झूनझूनवाला आपल्या चुकांवर दुःखी (Regret) होत नसत. ते त्या चुकांमधून काहीतरी शिकतात. इन्वेस्टींग शिकण्याची एकाच पद्धत आहे आणि ती म्हणजे अनुभव (Experience) आणि हा अनुभव चुकांमधून मिळतो. मार्केट बरोबर किंवा चुकीचं कधीच नसत. बरोबर आणि चुकीचं जे असत ते आपण स्वतः, म्हणून आपण जेव्हा काही चुकीचं करतो ती चूक आपण Accept करा. त्या चुकांमधून काहीतरी शिका आणि पुढे जा.

राकेश झूनझूनवाला Long Term Investor आहेत आणि ते एक Active Trader सुद्धा आहेत. करियरच्या सुरवातीला ट्रेडिंग करूनच आपला बेस (Base) पक्का केला होता. त्यांच्यामते Trading त्यांना Alert करते. राकेश यांनी भारताच्या ग्रोथ स्टोरी वर विश्वास ठेवला आहे. ते कुठल्याही कंपनीसोबत मानसिक दृष्टिकोन नसतो. ते सर्वांना पण हेच सांगतात. ते शेअर्स विकण्यासाठीच खरेदी करतात. राकेश यांच्यामते INVESTING हा जगातला सर्वात मोठा प्रोफेशन आहे.

राकेश झूनझूनवाला सिनेमा प्रोड्युसर सुद्धा आहेत. त्यांनी “English Vinglish, shamitabh and Ki & Ka.” हे सिनेमा प्रोड्युस केले आहे. ते खूप साऱ्या कंपनीचे M.D. सुद्धा आहे.

राकेश झूनझूनवाला यांना इंडियन वॉरेन बफेट असे म्हंटले जाते. आज ते भारतातले सर्वात प्रसिद्ध Stock Market Investor आहेत. Forbes च्या यादीत ते आज भारतातले ३९वे श्रीमंत Invester आहेत. त्यांच्या Net Worth $2.9 billion एवढं आहे. त्यांनी त्यांच्या ६०व्या बर्थडेला म्हणजे ५ जुलै २०२० ला २५% हिस्सा दान दिला.

हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर कंमेंट जरूर करा.

शेअर बाजारातील गुंतवणूक विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क आणि व्हॅट्सऍप करू शकता.

धन्यवाद.

2 Responses

Leave a Reply

×