आज या ब्लॉग च्या माध्यमातून आपण शेअर्स चे खरेदी विक्री संबंधी माहिती घेणार आहोत. सर्वात पहिले आपण ट्रेडिंगचे प्रकार पाहणार आहोत.
ट्रेडिंगचे (TRADING) विविध प्रकार आहेत त्या मध्ये
१. इंट्राडे ट्रेडिंग (INTRADAY TRADING).
२. डिलिव्हरी ट्रेडिंग (DELIVERY TRADING).
३. फ्युचर अँड ऑपशन ट्रेडिंग (FUTURE & OPTIONS).
हे सर्व ट्रेडिंगचे प्रकार आहेत. सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहोत इंट्राडे ट्रेडिंग (INTRADAY TRADING) म्हणजे काय ?
इंट्राडे ट्रेडिंग (INTRADAY TRADING) पद्धतीमध्ये गुंतवणूकदार मार्केट चालू झाल्यानंतर तो शेअर्सची खरेदी करू शकतो व मार्केट बंद होण्याअगोदर खरेदी केलेले शेअर्स विकू शकतो. म्हणजेच त्या गुंतवणूकदाराला खरेदी-विक्री चा व्यवहार पूर्ण करावा लागतो. या मध्ये गुंतवणूकदार तोट्यात असो किंवा नफ्यात त्याला तो व्यवहार बाजार बंद होण्याच्या अगोदर पूर्ण करावा लागतो. या व्यवहाराला इंट्राडे ट्रेडिंग (INTRADAY TRADING) असे म्हणतात.
दुसरी पद्धत आहे “डिलिव्हरी ट्रेडिंग (DELIVERY TRADING)” या ट्रेडिंग पद्धतीमध्ये ट्रेडिंग अकाउंट मार्फत खरेदी केलेले शेअर्स डिमॅट (DEMAT) अकाउंट मध्ये जमा होतात. व ते खरेदी केलेले शेअर्स कितीही दिवस तुम्ही तुमच्या डिमॅट अकाउंट मध्ये ठेऊ शकता. या मध्ये खरेदी केलेले शेअर्स त्याचे पैसे आपण संपूर्ण दिलेले असतात त्यामुळे इथे जेव्हा नफा (PROFIT) होईल तेव्हा ते शेअर्स आपण विकू शकतो. म्हणजे कोणत्याही प्रकारचे खरेदी-विक्रीचे बंधन या ठिकाणी राहत नाही, जेव्हा नफा होईल तेव्हाच आपण ते शेअर्स विकू शकतो. आपल्याला जर तोटा होत असेल तर तो शेअर्स कितीही दिवस डिमॅट अकाउंट मध्ये ठेऊ शकतो.
डिलिव्हरी ट्रेडिंग पद्धतीमध्ये आपण “शॉर्ट टर्म (SHORT TERM)” मध्ये खरेदी करू शकतो. या शॉर्ट टर्म मध्ये खरेदी करण्याचा कालावधी हा १ आठवडा, १ महिना, किंवा २ महिने ते शेअर्स “शॉर्ट टर्म (SHORT TERM)” मध्ये ठेऊ शकतो व चांगला नफा आल्यानंतर विकू शकतो. डिलिव्हरी ट्रेडिंग पद्धतीमध्ये दुसरी पद्धत आहे “मिडीयम टर्म (MEDIUM TERM)” या मध्ये ६ महिने किंवा १ वर्षा परियंत शेअर्स ठेऊ शकतो. या मध्ये चांगला नफा झाला असेल तर त्याला आपण विकू शकतो. डिलिव्हरी ट्रेडिंग पद्धतीमध्ये तिसरा प्रकार आहे “लॉंग टर्म (LONG TERM)” या पद्धतीमध्ये घेतलेला शेअर्स कितीही दिवस म्हणजे ५ ते १० वर्षांपरीयंत ठेऊ शकतो यामुळे आपल्याला जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. या लॉन्ग टर्म पद्धतीमध्ये धोका अजिबात नाही म्हणजे रिस्क (RISK) कमी असते.
“डिलिव्हरी ट्रेडिंग” पद्धतीमध्ये गुंतवणूकदारांना तोटा होण्याचा संभव किंवा शक्यता खूप कमी असते.
त्या नंतर ट्रेडिंग पद्धती मध्ये “फ्युचर ट्रेडिंग (FUTURE TRADING)” हा प्रकार आहे. या प्रकारात करार पद्धतीने एका शेअर्स ची लॉट साइज निश्चित केलेली असते त्याच बरोबर काही ठराविक कालावधीचा वेळ दिला जातो त्याला कॉन्ट्रॅक्ट (CONTRACT) असे म्हणतात. या प्रकारात ३ महिन्यांचे कॉन्ट्रॅक्ट एकाच वेळी काम करतात त्यामध्ये चालू महिना, त्या पुढील महिना व तिसरा महिना अशा तीन महिन्यांचा कॉन्ट्रॅक्ट मध्ये फ्युचर काम चालते. या मध्ये जास्त रिस्क घेऊन जास्त नफा (PROFIT) घेऊ शकतो. या मध्ये शेअर्स लॉट साइज वेळोवेळी बदलत असते. इथे शेअर्स सोबत इंडेक्स (INDEX) मध्ये सुद्धा खरेदी-विक्री करू शकता
उदा. बँक निफ्टी (BANK NIFTY) व निफ्टी (NIFTY) या इंडेक्स मध्ये आपण काम करू शकता.
या मध्ये दुसरा प्रकार आहे “ऑपशन्स (OPTIONS)”. ऑपशन्स (OPTIONS) हे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट (CONTRACT) पेक्षा वेगळे आहे. या मध्ये ऑपशन्स खरेदी दाराला “OPTIONS BUYER” असे म्हणतात व विक्रेत्याला “OPTION SELLER” असे म्हणतात. या मध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत CALL OPTION व PUT OPTION. CALL OPTION मध्ये खरेदी केलेले स्क्रिप्ट किंवा इंडेक्स (INDEX) भाव वाढला कि खरेदी दाराला नफा होतो व या उलट झाल्यास म्हणजे भाव कमी झाल्यास त्याने भरलेला प्रीमियम इतकाच तोटा होतो.
त्या नंतर “PUT OPTIONS” या मध्ये खरेदी करणार्याला SELLER असे म्हणतात. या SELLER ला अशी आशा असते कि स्क्रिप्ट किंवा इंडेक्स (INDEX) खाली येईल व अशा वेळेस नफा होईल, परंतु या उलट झाले स्क्रिप्ट किंवा इंडेक्स (INDEX) वाढला तर PUT OPTION मध्ये नुकसान होते त्यांनी भरलेल्या प्रीमियम इतकाच नुकसान होते.
या तिन्ही ट्रेडिंग पद्धतीमध्ये आपण यांची माहिती घेतली आहे. परंतु ट्रेडिंग करताना योग्य अभ्यास व योग्य नियोजन नसेल तर आपल्याला मार्केट मधून पैसे कमावता येणार नाही. त्या साठी मार्केटचा अभ्यास असणे महत्वाचे आहे.
तुम्हाला जर का हा ब्लॉग आवडला असेल तर कंमेंट करायला विसरू नका व तुमच्या गुंतवणूकदार मित्रांसोबत शेअर जरूर करा.
गुंतवणूक विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला ९६६४३३७८३६ या नंबर वर संपर्क करू शकता.
धन्यवाद.
Nice information…👌🏻👍🏻
Masta vivek👍
Awsn vivek👍
Ek no बच्ची 👍
Nice info Vicky 👍