शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सर्वात पहिले डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे. हे डिमॅट अकाउंट तुम्ही विवेक इन्व्हेस्टमेंट च्या माध्यमातून ओपन करू शकता.
डिमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर मुख्यगोष्ट म्हणजे गुंतवणुकीला सुरवात करणे. गुंतवणुकीला सुरवात करताना छोट्या अमाऊंट ने सुरवात करावी. दहा हजार, वीस हजार रुपयांनी सुरवात करावी. कोणतेही दोन स्टॉक निवडावे आणि त्यात गुंतवणूक करावी आणि काही दिवसानंतर त्या शेअर ची किंमत वाढली तर नफा बुक करून त्यातुन बाहेर पडावे. यामुले आपल्याला आत्मविश्वास वाढेल. योग्य वेळी खरेदी करणे योग्य वेळी विक्री करणे या गोष्टींचा अनुभव येईल. अनुभव आल्यानंतर व शेअर बाजाराचा योग्य अभ्यास केल्यानंतर, बाजाराची मुहमेंन्ट पकडणे शक्य होईल. कोणत्या गोष्टींचा शेअर बाजारावर परिणाम होतो हे हळूहळू तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर आपण आपल्या शेअरची संख्या वाढवावी व नफा मिळवत राहावा. हे सर्व शिकण्यासाठी प्रॅक्टिकल अनुभव घ्यावा लागेल. प्रॅक्टिकल केलेली गुंतवणूक आपल्या मानसिकतेचा परिचय करून देते. आपल्या भावना त्याच्यासोबत जोडलेल्या असतात त्यामुळे आपल्याला चांगला अनुभव व चांगला आत्मविश्वास मिळतो. उदा. आपल्याला गाडी कशी चालवावी हे फळ्यावर समजून सांगितले तर ऐकायला बरे वाटेल समजायला सोपे वाटेल, परंतु तिथेच गाडी हातात घेऊन चालवणे कठीण आहे. कारण आपल्याला एकाच वेळेस बऱ्याच गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते म्हणजे गाडीचे हॅन्डल, एक्सिलेटर, रस्त्यावरील ट्राफिक, ब्रेक या सर्व गोष्टी प्रॅक्टिकल केल्यानंतर समजते व आपण आपल्या ठिकाणी पोहचूशकतो.
त्याच प्रमाणे शेअर गुंतवणुकीत प्रॅक्टिकल करणे गरजेचे आहे. अगदी कमीत कमी भांडवलामध्ये शेअर घेण्याची प्रॅक्टिस करावी. जर या मध्ये यशस्वी झालात तर नंतर तुम्ही तुमचा भांडवल वाढवावे.
हळू हळू ट्रेडिंग करायला सुरवात करावी, शेअर मार्केट रोज नवनवीन अनुभव देत असतो त्या अनुभवातून शिकून तुम्ही पुढे जावे.
टेक्निकल, फंडामेंटल हा अभ्यास सुरु करावा. हा अभ्यास कसा करावा? या विषयाची माहिती आपण पुढच्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका.
शेअर बाजारातील गुंतवणूक विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क आणि व्हॅट्सऍप करू शकता.
धन्यवाद
Nice sir
Good information..👌🏻😍👍🏻
Nice info for startup