प्रत्येक व्यक्तीला चांगले जीवन जगण्यासाठी, मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी चांगली कमाई असणे गरजेचे आहे. आजच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्तीला शेअर मार्केट मध्ये जास्त पैसे मिळत असल्यासारखे वाटत आहे म्हणून जास्तीत जास्त व्यक्ती तिथे आकर्षित होत आहे. परंतु एका गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे कि आपल्याला एका दिवसात श्रीमंत होणे शक्य नाही. पण आपण व्यवस्तिथपणे जाणकारांच्या मदतीने गुंतवणूक केली तर ती अयोग्य ठरत नाही.
शेअरबाजारातील गुंतवणुकीचे खालील प्रमाणे वर्गीकरण केले आहे..
१) जे शेअरधारक कमी कालावधीत शेअर ची देवाणघेवाण करतात त्यांना शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असे म्हणतात.
२) काही शेअर धारक असे आहेत जे कोणत्याही १० किंवा १५ स्क्रिप्ट मध्ये पैसे इन्व्हेस्ट करून ३ ते ५ वर्षापरीयंत ठेवतात आणि त्याची खरेदीही मार्केट मध्ये भाव खाली आले कि ५ ते १० टक्यांनी करतात.
३) मार्केटमध्ये काही गुंतवणूकदार एका दिवसात शेअरची खरेदी विक्री करून नफा अथवा तोटा बुक करून व्यवहार पूर्ण करतात. भांडवलाची कमी असल्याने त्यांना अशा एकदिवसात व्यवहार करावा लागतो परंतु यात फार धोका आहे.
४) फ्युचर ऑपशन्स या व्यवहारात स्क्रिप्ट मध्ये काम करण्यासाठी बाजारातून एक लॉट घेण्यासाठी १०% ते २०% मार्जिन द्यावे लागते. या व्यवहारात व्यवहार करण्यासाठी जास्त भांडवलाची गरज असते यात धोका हि खूप जास्त आहे. पण TECHNICAL ANALYSIS च्या माध्यमातून तुम्ही हा धोका कमी करू शकता. TECHNICAL ANALYSIS च्या माध्यमातून तुम्ही जास्त नफा आणि कमी तोटा करू शकता.
पहिले वरील दोन गुंतवणुकीचे प्रकार हे जीवनामध्ये सोयीस्कर असू शकते फक्त त्या मध्ये डोकं शांत ठेऊन व्यवस्थित काम केले तर नफा मिळविता येतो. तिसऱ्या प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये माज्या मते १० दिवसात झालेला नफा एका दिवसात झालेल्या नुकसानामध्ये निघून जाऊ शकतो.
हा शेअर मार्केट मधील इतिहास आहे म्हणून शक्यतो शेअरधारकांनी एका दिवसातील देवाण घेवाण यांपासून दूर राहणे आवश्यक आहे. जर आपण एकाच दिवशी ८% ते १२% प्रॉफिट कमावला तर आपण त्यामध्ये कोणताही प्रकारची चूक केली नाही परंतु त्यामुळे आपल्याला लोभ वाढतो म्हणून ती सवय आपण लावून घेऊ नये.
या मार्केट मध्ये सर्व स्क्रिप्टचे वेगवेगळ्या विभागात वर्गीकरण केलेले असते. उदा. ACC cement sector, ASIAN PAINT paint sector TCS information technology sector इत्यादी गुंतवणूकदाराने आपली गुंतवणूक हि एकाच विभागात न करता वेगवेगळ्या विभागात केली पाहिजे.
या मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कुठल्या विभागातील मार्केट चांगले आहे हे पाहून चार पाच विभागाचे नियोजन करून प्रत्येक थोडी थोडी गुंतवणूक करून योग्य प्रकारे नफा मिळवता आला पाहिजे.
काही गुंतवणूकदार अशा स्क्रिप्ट मध्ये गुंतवणूक करतात ज्यात नफ्याचे प्रमाण हळू हळू वाढते आणि काही गुंतवणूकदार लवकर नफा मिळावा म्हणून अशा स्क्रिप्ट मध्ये गुंतवणूक करतात ज्यात नफ्याचे प्रमाण लवकर वाढते परंतु त्यात धोक्याचे प्रमाणहि जास्त असते म्हणून अशा स्क्रिप्टपासून दूर राहणे योग्य आहे. जर का गुंतवणूक केलीच असेल तर नफा मिळाल्याबरोबर लगेच बाहेर आले पाहिजे या गुंतवणुकीत आपण पूर्ण पैशातील फक्त २० % ते २५% भाग गुंतवला पाहिजे हि गुंतवणूक कशी करावी तसेच त्यातून कसे बाहेर पडावे हे व्यवस्तीत माहित असणाऱ्यानेच हा व्यवहार करावा.
जर तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायचे ठरवले असेल तर तुम्ही तुमची रक्कम नक्की करून मार्केटच्या शर्तीनुसार जर मार्केट खाली येत असेल तर खरेदी करू नये आणि मार्केट ज्यावेळेस प्रगती करत असेल त्या वेळी कमी रक्कम गुंतवणूक करून शेअर खरेदी करावे. एकाच दिवशी आपण मोठ्या रकमेची खरेदी करू नये, जेणे करून आपल्याला तेथे अडकल्या सारखे वाटेल. तुम्हाला तुमची ठरवलेली स्क्रिप्ट जर योग्य भावात मिळत नसेल त्यासाठी ती तुम्ही ती जास्त भावामध्ये घेण्याची घाई करू नये आणि नाही मिळाली तर त्यामुळे कोणताही प्रकारचे दुःख करू नये. आपल्याला ती स्क्रिप्ट नंतर कमी भावात मिळू शकते माझे तुम्हाला सांगणे आहे कि केव्हाही एकाच स्क्रिप्ट मध्ये पूर्ण गुंतवणूक करू नका. आपल्या गुंतवणुकीतील ५% ते ७% एवढीच गुंतवणूक करा हा सामान्य शेअर मार्केटचा सिद्धांत आहे. कंपनीची सर्व माहिती काढून त्यातील चांगली स्क्रिप्ट निवडून आपले पैसे गुंतवावे.
मार्केटमध्ये शेअर खरेदी करतेवेळी त्या कंपनीचे संचालन कसे आहे व त्या कंपनीचे मार्केटमध्ये किती प्रमाणात वरचढ आहे याची माहिती करून घ्यावी. ती कंपनी आपल्याला भविष्यासाठी चांगली आहे कि नाही हे सगळे पडताळून तिने आपल्याला वर्तमानात कमी नफा मिळवून दिला तरी चालेल परंतु भविष्यात चांगला नफा मिळविण्यासाठी त्याच कंपनीत आपण गुंतवणूक केली पाहिजे.
आजचा ब्लॉग कसा वाटला हे कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी DEMAT अकाउंट असणे गरजेचे आहे. DEMAT अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्ही मला खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करू शकता
No. ९६६४३३७८३६.
धन्यवाद.