कशी होते I.P.O. मध्ये शेअर्सची ALLOTMENT (वाटप) ?

Vivek Investment > Marathi > कशी होते I.P.O. मध्ये शेअर्सची ALLOTMENT (वाटप) ?

IPO (ALLOTMENT) ऑलॉटमेंटची प्रक्रिया कशी असते हे समजण्यापूर्वी पहिले IPO गुंतवणूकदारांची (INVESTORS) श्रेणी (CATEGORY) काय असते हे आपण पहिले समजून घेऊया.

IPO मध्ये प्रकारचे गुंतवणूकदार (INVESTORS) असतात.

) Qualified Institutional Buyers (QIB)

) Non Institutional Investors म्हणजे (NII)/ High Net Worth Investors म्हणजे (HNI)

) Retail Investors.

 

  1. Qualified Institutional Buyers (QIB):- हि संस्था आपल्या स्वतःच्या गुंतवणुकीसाठी आणि लोकांसाठी गुंतवणूक (Investment) करतात. जसे Mutual Fund, Pension Fund, Provident Fund, Insurance Company इत्यादी.  QIB हे खूप मोठ्या प्रमाणात पैशांची गुंतवणूक करतात.  IPO साठी सगळ्या श्रेणीसाठी (Category) एक कोटा (Quota) आरक्षित (Reserve) केलेला असतो. IPO  मध्ये QIB’s  साठी जास्तीतजास्त ५०% कोटा (Quota) आरक्षित (Reserve) केला जाऊ शकतो.
  2. Non Institutional Investors किंवा HNI :- या श्रेणी (Category) मध्ये Individual Investors, NRI, HUF हे सगळे येतात. NII  मध्ये २०००००/- रुपयांपेक्षा जास्त IPO apply करू शकता. IPO  साठी १५% कोटा (Quota) या NII साठी आरक्षित (Reserve) केलेला असतो. NII  ला HNI पण बोल्ले जाते
  3. Retail Investors:- Retail Investors म्हणजे तुम्ही आणि मी जे IPO मध्ये २०००००/- रुपयांपेक्षा कमी apply करतात. IPO साठी कमीतकमी ३५% कोटा (Quota) आरक्षित (Reserve) केलेला असतो.  

 

IPO मध्ये शेअर्सची bid केल्यानंतर काही दिवसानंतर शेअर्सची Allotment प्रोसेस केली जाते. IPO मध्ये कंपनी लॉट मध्ये शेअर्स बाजारात आणते आणि त्या कंपनीचे शेअर्स आपण लॉट मध्ये विकत घेतो.

IPO मध्ये Oversubscribe काय असते?:-

Oversubscribe म्हणजे जेवढे शेअर्स कंपनी बाजारात आणते त्याच्यापेक्षा जास्त शेअर्सची मागणी झाली तर त्याला Oversubscribe असे म्हणतात. उदा  जर कुठल्या एका कंपनीने IPO साठी Retail Investor ला १००००० शेअर्स bid करायला आरक्षित ठेवले असतील आणि शेअर्सची मागणी (demand) २००००० शेअर्सची असली तर त्याला Oversubscribe असे म्हणतात

IPO साठी QIB, HNI, Retail Category साठी वेगवेगळे कोटा (Quota) आरक्षित ठेवलेला असतो

IPO जेवढे Oversubscribe होतात तेव्हा IPO मिळण्याची संधी कमी असते. आपल्या सोबत खूप वेळा असं होत कि आपण IPO साठी bid तर करतो पण आपल्याला तो मिळत नाही पण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना मिळतो. तर हे सगळं लॉटरी पद्धतीने (Lottery System) होते.  

 

आजचा ब्लॉग कसा वाटला हे कंमेंट मध्ये लिहून नक्की सांगा

धन्यवाद.

Leave a Reply

×