भारतामध्ये “बॉम्बे स्टॉक एक्सचेंज” म्हणजे बि. एस. ई. (BSE) आणि “नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे एन. एस. ई. (NSE) हे दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत.
स्टॉक एक्सचेंज एक मार्केट आहे जिथे शेअर विकत घेणारे आणि शेअर विकणारे यांच्यामध्ये देवाण–घेवाण होते. nifty आणि sensex दोन्ही index आहेत. सेन्सेक्स Bombay Stock Exchange चा Index आहे आणि निफ्टी National Stock Exchange चा Index आहे.
BSE मध्ये ५००० पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत आणि NSE मध्ये १६०० पेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत. मार्केट ची स्थिती जाणून घेण्यासाठी एवढ्या सगळ्या कंपन्यांचा अभ्यास कारण शक्य नाही म्हणून इंडेक्स (Index) बनवले आहे. भारतामध्ये स्टॉक मार्केटची स्थिती जाणून घेण्यासाठी सगळ्या कंपन्यांचा अभ्यास करणे गरजेचे नाही. फक्त Nifty आणि Sensex बघून तुम्ही जाणून घेऊ शकता कि भारतातल्या शेअर बाजाराची परिस्थिती काय आहे.
जेव्हा Nifty आणि Sensex वरती असते म्हणजे हिरव्या (Green) कलर मध्ये असते तेव्हा आपण म्हणतो शेअर बाजार वरती आहे. जेव्हा Sensex आणि Nifty खाली असते म्हणजे लाल (Red) कलर मध्ये असतो तेव्हा आपण म्हणतो शेअर बाजार खाली आहे. म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे एका रुग्णाचे ब्लड रिपोर्ट त्याच्या तब्येतीची माहिती देते तसेच Nifty आणि Sensex भारतीय शेअर बाजाराची तब्येतीची माहिती देते. तसेच Nifty आणि Sensex भारतीय शेअर बाजाराची तब्येतीची माहिती देते. आज Nifty आणि Sensex हिरव्या (Green) कलर मध्ये आहे याचा अर्थ असा आहे कि Nifty आणि Sensex कालच्या क्लोजिंग (Closing) पेक्षा वरती आहे आणि Nifty आणि Sensex आज लाल (Red) कलर मध्ये आहे याचा अर्थ असा आहे कि ते कालच्या क्लोजिंग (Closing) पेक्षा खाली आहे.
Sensex हा शब्द Sensitive आणि Index या दोन शब्दांनी एकत्र करून बनवला आहे. Sensitive चे पहिले चार शब्द आणि Index चे शेवटचे दोन शब्दांनी Sensex हा शब्द बनवला आहे. Sensex मध्ये ३० कंपन्यांची नोंद केली आहे. याचा अर्थ Sensex ची वाटचाल या ३० कंपन्यांच्या मुहमेंटवर डिपेंड आहे. तसेच Nifty सुद्धा National आणि Fifty या शब्दांना एकत्र करून Nifty ५० हा शब्द बनवला आहे. नीफटी ५० का ? कारण Nifty ५० Index मध्ये ५० कंपन्या आहेत.
Nifty आणि Sensex मध्ये वेगवेगळ्या Sector चे मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश असतो. Nifty आणि Sensex चा Performance हा भारतीय शेअर बाजाराचा Performance समजला जातो.
स्टॉक मार्केटमध्ये या व्यतिरिक्त सुद्धा Index असतात. NSE आणि BSE वर सगळ्या सेक्टरमधले वेगवेगळे Index आहेत. तुम्हाला जर बँकिंग सेक्टर विषयी माहिती घेयची असेल तर NSE मध्ये BankNifty या Index ला बघू तुम्ही बँकेची परिस्थिती समजून घेऊ शकता. शेअर मार्केटमध्ये Small Cap आणि Mid cap हे Index सुद्धा असतात जसे S&P BSE Small Cap, S&P BSE Mid Cap आणि Nifty Mid Cap Fifty इत्यादी. इथे तुम्हाला स्मॉल कॅप आणि मिड कॅप चे परफॉर्मन्स समजते.
जर तुम्हाला माहित नसेल कि स्मॉल कॅप, मिड कॅप आणि लार्ज कॅप काय असते ते, तर आपण ते पुढच्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.
सेन्सेक्स आणि निफ्टी हे FREE FLOAT MARKET CAPITALIZATION ने calculate केले जाते. Sensex मध्ये जे ३० कंपन्या आहेत त्यांचे FREE FLOAT MARKET CAPITALIZATION चा एव्हरेज आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स च्या चालकलशन करण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त Nifty आणि Sensex वर लक्ष ठेवायची गरज आहे. निफ्टी खाली जातोय कि वरती जातोय यावर आपला लक्ष असला पाहिजे.
जर Nifty आणि Sensex मधला कुठलाही Stock जर का खराब Perform करत असेल तर Stock Exchange त्या Stock ला Index मधून बाहेर काढून त्याच्या जागी दुसऱ्या Stock चा सामावेश केला जातो आणि हा निर्णय Stock Exchange स्वतः घेतात. २०१६ मध्ये Nifty५० मधून Carin India, Vedanta, PNB यांना काढून Aurobindo Pharma, Bharti Infratel, Eicher Motors यांना Nifty ५० मध्ये सामील केले.
तुम्हाला शेअर मार्केट शिकण्याची इच्छा असेल तर आमच्या वेबसाइटला www.vivekinvestment.com ला जरूर भेट द्या आणि त्याच सोबत आमच्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं हे कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका.
धन्यवाद .
Very well written
Nice information……👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Nice information.
Like to join you.