आजच्या ब्लॉग मध्ये आपण Technical Analysis बद्दल माहिती घेणार आहोत.
हि गोष्ट १८०० च्या काळातील आहे. जपानच्या ओसाका (Osaka) या शहरात जस आज शेअर मार्केट मध्ये शेअर्सची देवाण–घेवाण होते तसेच तांदूळ (Rice) ची देवाण–घेवाण होत होती. ओसाका जपान मधील एकच Rice Exchange होते.
शेतकरी खूप लांबून ओसाका (Osaka) मध्ये तांदुळाची खरेदी–विक्री करायला येयचे. होमा (Homma) नावाचा माणूस हा त्यावेळी तांदळाचा व्यापारी (Rise Merchant) होता त्यावेळी तांदुळाची ट्रेडिंग करण्यासाठी ओसाका या शहरात आला होता. तेव्हा त्याने तिकडे दोन शेतकरी लोकांचे संभाषण ऐकले ते बोलणे असे होते कि “जेव्हा मी तांदूळ बाजारात विकायला आणले तेव्हा त्याचा भाव ४० होता आणि तो बाजार बंद होताना ४५ झाला आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी मी उतावीळपणाने तांदूळ बाजार उघडताच ४५ ला विकून टाकले आणि बाजार बंद होताना त्याचा भाव हा ५० झाला होता आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा मार्केट सुरु झाले तेव्हा त्याचा भाव ६० झाला“. हे ऐकून होमा अस्वस्थ झाले सगळे लोक या वाढलेल्या किमती बघून हैराण झाले होते. कारण त्यांना माहित नव्हते कि तांदुळाची किंमत ४५ वरून ६० परियन्त जाणार आहे ते. सगळ्या शेतकऱ्यांनी आपले तांदूळ हे ४५ ला विकले होते.
होमा ने असे ठरवले कि तांदळाच्या किमतीवर लक्ष ठेवले पाहिजे आणि तांदुळाची खरेदी–विक्री करणाऱ्याचे पण विचार करायला पाहिजे. होमा ने या गोष्टींचा अभ्यास करायला सुरवात केली पण एक प्रॉब्लेम होता होमा हा साकाता (SAKATA) मध्ये राहत होता ते ओसाका पासून ६०० कि.मी. होते. आता तांदळाच्या किमती नोंद करायचा तर कशा? या गोष्टींवर उपाय म्हणून होमा ने प्रत्येक ६ किलोमीटर वर एक माणूस नेमला झेंडा घेऊन आणि त्या झेंड्याच्या मदतीने मार्केटची मुहमेंन्ट पकडून पेपरवर चार्ट (Chart) बनवायला सुरवात केली होमा ने खूप प्रयात्नानंतर त्याने मार्केटच्या Opening Price, Closing Price, Highest Price, Lowest Price यांचा रेकॉर्ड बनवून काही चार्ट बनवले काही दिवस यांची नोंद आशिच चालू ठेवली याची नोंद करत असताना होमा ला काही सिग्नल (Signals) आणि Patterns दिसले आणि त्या Patterns ला नाव देण्यात सुरवात केली Doji, Tasuki, Harmi, Draganfly Doji इत्यादी. त्यानंतर होमाने प्रत्येक Pattern ला विशिष्ठ संदर्भ दिला जस तांदळाची opening price आणि closing price एकच असायची तेव्हा होमा त्याला “DOJI” नाव दिले. आणि हाच Pattern होमाचा नवीन सिद्धांत बनला.
होमा जगातला पहिला ट्रेडर होता. तांदळाच्या किमतीला ट्रॅक करून माल विकणारे आणि विकत घेणाऱ्यांच्या Physiology Behaviour ला समजले आणि याचा उपयोग होमा ने ट्रेडिंग मध्ये केला. होमाची हि पद्धत Technical Analysis मध्ये जगातलं पाहिलं उदाहरण आहे. त्याने या पद्धतीचा उपयोग करून १०० ट्रेडिंग मध्ये यश मिळवले होते. काही वर्षानंतर जपान सरकारने त्याला Financial Advisor बनवले.
जपानच्या ट्रेडर्स लोकांनी या गोष्टींचा उपयोग करायला सुरवात केली. नंतर स्टिव्ह निसोन ( Steve Nison) या ट्रेडरने त्याला Japnese Candlestick हे नाव दिले. या गोष्टींचा संशोधन करून शेअर मार्केट मध्ये याचा उपयोग करायला सुरवात केली.
Technical Analysis चा दुसरा पार्ट आपण पुढच्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.
आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका.
धन्यवाद.
Sunder !!!!