“कॉटनकिंग” चे संचालक प्रदीप मराठे हे मूळचे मिरजेचे नोकरीसाठी ते पुण्यात आले आणि पुण्यातच स्थायिक झाले. त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेऊन मार्केटिंग मध्ये MBA पूर्ण केले आणि नोकरीस लागले. त्या काळी MBA करणारे विध्यार्थी कमी होते आणि मराठे यांच्या कौशल्यामुळे त्यांना नोकरीत उत्तम यश मिळत गेले. आपला स्वतःचा व्यवसाय असावा हे त्यांच्या डोक्यात आधीपासून घोळत होते.
नोकरीत जम बसवल्यानंतर व्यवसायाला पुरेसे भांडवल आपण उभे करु शकू असे त्यांना वाटू लागले पण एकदम नोकरी सोडून व्यवसाय करायचा हे धाडस होत नव्हते. पण एक दिवस त्यांनी निश्चय केला आणि नोकरीचा राजीनामा दिला.
व्यवसाय काय करावा हा आणखीन महत्वाचा प्रश्न होता. मराठे यांचे मार्केटिंगचे काम होते ते फ्रिज, ऐरकंडिशन (AC) यांचे होते. पण त्यांना ह्या क्षेत्रा पेक्षा वेगळा असं काहीतरी करायचं होत म्हणून त्यांनी कॉटन शर्ट्स हा पर्याय निवडला.
समाजात अशी काही लोक असतात जी समाजाला पुढे घेऊन जातात. आज प्रत्येक घरात यांच्या ब्रॅण्डचा शर्ट वापरला जातो. आज प्रत्येक घराघरात ज्याचे शर्ट आवर्जून वापरले जातात आणि तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या आवडता ब्रॅण्ड म्हणजे “कॉटनकिंग”.
मराठे याना स्वतःला कॉटन चे कपडे आवडतात पण खरेदीला गेल्यावर दुकानांमध्ये फारसे वैविध्य मिळत नाही अशी त्यांची ग्राहक म्हणून तक्रार असे.
मोठ्या ब्रॅण्डचा कपडा खरेदी करायचे म्हंटले तर किमती खूप असायच्या. आपल्यासारखे अनेक ग्राहक चांगल्या पर्यायाचा शोधात असतील हे त्यांना जाणवले. कपड्यांच्या व्यवसायाची विशेष माहिती नसतानाही त्यांनी याच व्यवसाय निवडला.
यातून १९९६ मध्ये “कॉटनकिंग” नावाचा ब्रॅण्ड सुरू झाला. सुरवातीला हा स्वतंत्र ब्रॅण्ड नव्हता. विविध ब्रॅण्डचे कॉटनचे कपडे विकत घेऊन मराठे यांच्या दुकानात विक्रीस ठेवत. यात ग्राहकांना कॉटन शर्ट्सचे वैविध्य मिळू शकत होते पण मुळात कापड दुसऱ्या ब्रॅण्डचा असल्यामुळे मराठे यांना त्यांच्या किमती स्वतःच्या मनासारखे ठेवता येत नव्हत्या. म्हणून “कॉटन किंग” हा ब्रॅण्ड म्हणून सुरु करून त्याचे उत्पादन स्वतः करायचे ठरवले. १९९८ मध्ये शर्ट्सचे उत्पादन सुरु झाले. उत्पादनात कॉटन किंग २००४ परियंत स्वयंपूर्ण झाले होते. प्रथम त्यांनी फॉर्मल शर्ट्स बनवले नंतर एकामागून एक कॅज्युअल शर्ट, टी–शर्ट, ट्राउझर आणि जीन्स हे कपडेही बनवण्यास सुरवात केली.
राज्यात सर्व मोठ्या बाजारांमध्ये ह्या ब्रॅण्डचे शोरूम आहेत आता कर्नाटक गोवा या राज्यातही हा ब्रॅण्ड पोहोचलेला आहे. पुढच्या टप्यात आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यात ब्रॅंचेस सुरु करण्याचा विचार चालू आहे.
पूर्णपणे वेगळ्या क्षेत्रातील माणसाने आपल्या चाळीसाव्या वर्षी सुरु केलेला हा ब्रॅण्ड आता वीस वर्षांचा होत आहे. “कॉटनकिंग” कॉटनच्या शर्टमधील पुणेरी ब्रॅण्ड पुण्यात नळ स्टॉपवर प्रथम सुरु झाला व आज राज्याच्या सर्व मुख्य बाजारपेठेत व इतर राज्यांमध्येही पोहचला. आज कॉटनकिंगचे १२० पेक्षा जास्त FRANCHISE आहेत व कॉटनकिंगचा रेवेन्यू ४०० करोड रुपये पेक्षा जास्त आहे.
आजचा ब्लॉग कसा वाटलं हे कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका.
धन्यवाद.