भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा शेअर बाजार घोटाळा= हर्षद मेहता घोटाळा.

Vivek Investment > Marathi > भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा शेअर बाजार घोटाळा= हर्षद मेहता घोटाळा.

जेव्हा आपण “हर्षद मेहता” च नाव ऐकतो तेव्हा सर्वप्रथम आपल्या डोक्यात येते ते म्हणजे शेअर बाजारातील घोटाळा. हर्षद मेहताने शेअर बाजारातील केलेल्या घोटाळ्यामुळे देशातील अर्थव्यवस्था हलवून टाकली होती.

आजच्या ब्लॉग मध्ये आपण हर्षद मेहताने केलेल्या घोटाळ्याविषयी माहिती घेणार आहोत.

हर्षद ने आपले शिक्षण “लाला लजपत रॉय” कॉलेज मुंबई येथून पूर्ण केले. आणि पुढचे काही वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांना मध्ये नोकरी केली. नोकरी करत असताना त्याला “शेअर मार्केट” मध्ये आवड झाली. काही दिवसानंतर हर्षद ने नोकरी सोडली व “बी. अंबालाल (B. AMBALAL)” ब्रोकर सोबत काम करू लागला. काही दिवसा नंतर हर्षद “जे. एल. शाहा आणि नंदलाल शेट ” चा स्टॉक ब्रोकर (STOCK BROKER) बनला.

१९८४ मध्ये हर्षद ने आपल्या भावासोबत GROW MORE RESEARCH & ASSET MANAGEMENT नावाची कंपनी चालू केली आणि BSE (BOMBAY STOCK EXCHANGE) चा ब्रोकर बनून आपला स्वतःचा ब्रोकरिंग बिझनेस चालू केला.

हर्षद ने आपल्या घोटाळ्यामध्ये (SCAM) READY FORWARD DEAL चा वापर केला. सरकार (GOVERNMENT) आपले स्वतःचे प्रकल्प (PROJECT) चा खर्च भागवण्यासाठी सिक्युरिटी (SECURITY) आणते त्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटी (GOVERNMENT SECURITY) असे म्हणतात. उदा. गव्हर्नमेंट बॉण्ड (GOVERNMENT BOND) मार्फत सरकार आपला खर्च भागवण्यासाठी पैसे घेतात. या पैशांच्या बदल्यात सरकार गुंतवणूकदारांना काही ठराविक व्याज देते. भारताच्या सगळ्या बँकांना या सिक्युरिटी मध्ये काही पैसे गुंतवणे बंधनकारक होते. जेव्हा कुठल्या बँकेला पैशांची गरज असते तेव्हा बँक आपली गव्हर्नमेंट सिक्युरिटी दुसऱ्या बँकेला विकत होती आणि त्यांच्याकडून शॉर्ट टर्म मध्ये कर्ज (LOAN) घेत होती. आणि काही दिवसानंतर ती बँक व्याजा सकट दुसऱ्या बँकेला पैसे परत करत होती आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी परत घेत होती. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जेव्हा आपल्याला पैशांची गरज असते तेव्हा आपण आपल्याकडे असलेलं “सोन” सावकाराकडे गहाण ठेवतो आणि व्याजावर पैसे घेतो. काही दिवसा नंतर आपलं काम झाल्यानंतर सावकाराकडे आपण परत जातो त्याचे पैसे आपण व्याजासकट परत करतो आणि आपला सोन परत घेतो.

त्याच प्रमाणे “READY FORWARD DEAL” मध्ये एक बँक दुसऱ्या बँकेला गव्हर्नमेंट सिक्युरिटीच्या बदल्यात शॉर्ट टर्म (SHORT TERM) मध्ये कर्ज देत होती. थोडक्यात “R.F.D. म्हणजे READY FORWARD DEAL” बँकांसाठी शॉर्ट टर्म कर्जाचे साधन होते..

READY FORWARD DEAL मध्ये ब्रोकर बँकांमध्ये मध्यस्थीचे काम करत होते. त्यांचं काम हे होत कि ज्या बँकांना सीक्युरिटी विकायची आहे त्यांच्यासाठी खरेदीदार शोधणे आणि ज्या बँकांना सीक्युरिटी विकत घेयची आहे त्यांच्यासाठी सीक्युरिटी विकणारा शोधून देणे. हर्षद मेहता एक ब्रोकर होता तो सुद्धा बँकांच्या मध्ये मध्यस्थी (MEDIATOR) होता. “R.F.D.” मध्ये काही “पळवाटा (LOOPHOLES)” होत्या. या RFD च्या माध्यमातून गैर मार्गाने पैसे कमावले जात होते. आणि ता बद्दल हर्षद ला सगळ्या गोष्टी माहित होत्या आणि हर्षद ने या गोष्टींचा उपयोग आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी करून घेतला.

समजा चार बँक आहेत बँक A, बँक B, बँक C, आणि बँक D.

बँक A ला जेव्हा गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकायची असते तेव्हा हर्षद मेहता त्यांच्यासाठी ब्रोकेरच काम करत होता म्हणजे बँक A साठी खरेदीदार शोधत होता. बँक A कडून गव्हर्नमेंट सिक्युरिटी घेत होता आणि त्या सिक्युरिटी विकण्यासाठी बँक A कडून काही वेळ मागत होता. आणि तेव्हा बँक B ज्याला गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकत घेयची असते त्यांच्याकडून पैसे घेयचा आणि सिक्युरिटी आणून देण्यासाठी काही वेळ मागायचा. अशा पद्धतीने बँक A कडून घेतलेली सिक्युरिटी आणि बँक B कडून घेतलेले पैसे (CASH) काही दिवस आपल्याकडे ठेवायचा. RBI च्या नियमानुसार (GUIDELINE) कोणतीपण बँक सरळ ब्रोकरच्या नावाने चेक (CHEQUE) काढु शकत नव्हते. गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकत घेणारी बँक गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकणार्या बँकेच्या नावाने चेक (CHEQUE) काढत होती नाही ब्रोकर च्या नावाने. पण या प्रकरणामध्ये चेक (CHEQUE) ब्रोकर हर्षद मेहतांच्या नावाने काढला जात होता.

खूप साऱ्या बँकांना हे हि माहित नव्हतं कि आपला व्यवहार हा कुठल्या बँकेसोबत केला जातोय. कारण बँक सरळ हर्षद सोबत व्यवहार करत होती आणि म्हणून हर्षद सिक्युरिटी विकत घेणाऱ्या बँकेला स्वतःच्या नावाने चेक काढायला सांगत होता. हर्षद सगळ्या बँकांसोबत ब्रोकेरच काम खूप चांगल्या प्रकारे करत होता कारण त्या वेळेस मार्केट मध्ये हर्षदच नाव खूप चांगला होत. आणि हर्षद ने याच विश्वासाचा चुकीचा फायदा घेतला. त्याने बँकेतून मिळालेला पैसा “स्टॉक मार्केटमध्ये ” शेअर्सची किंमत वाढवण्यासाठी उपयोग केला. काही दिवसानंतर बँक A हर्षदला विकलेली सिक्युरिटीचे पैसे मागायची तेव्हा हर्षद कोणतीतरी दुसरी बँक शोधायचा जिला गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकत घेयची आहे.

समजा बँक C ला गव्हर्नमेंट सिक्युरिटी पाहिजे असेल तेव्हा हर्षद बँक C कडून पैसे घेयचा आणि सिक्युरिटी आणून देण्यासाठी काही वेळ मागायचा आणि बँक A कडे जाऊन त्यांना त्यांचे पैसे परत करत होता. बँक B आणि बँक C चे व्यवहार पूर्ण करण्यासाठी कुठलीतरी दुसरी बँक शोधायचा अशा प्रकारे “R.F.D.” उपयोग हर्षद चेन (CHAIN) सारखा उपोग केला. याच्याने हर्षद च्या हातात चांगला पैसे राहत होता अशा या चेन (CHAIN) पद्धतीचा वापर हर्षद ने शेअर मार्केटच्या घोटाळ्यात केला.

तर आता आपण बघितले कि कसे “R.F. D.” पद्धतीने एक बँक दुसऱ्या बँकेला शॉर्ट टर्म साठी गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकते तेव्हा ती बँक सिक्युरिटी विकत घेणाऱ्या बँकेला एक रिसिप्ट देते म्हणजे “बँक रिसिप्ट (BANK RECEIPT)” असे म्हणतात. त्या बँक रिसिप्ट मधून हे सिद्ध होत कि गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकली(SELL) गेली आहे आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकणाऱ्याला पैसे मिळाले आहे.

हर्षदला शेअर्स ची किंमत गैरमार्गाने वाढवण्यासाठी त्याला पैशांची गरज होती तेव्हा तो अजून एक पाऊल पुढे गेला. काही बँकांच्या मदतीने बनावट (FAKE) बँक रिसिप्ट बनवले आणि त्याचा वापर करू लागला. ज्या बँकांना गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकत घेयची होती त्यांना बनावट बँक रिसिप्ट देयचा. बँक हे समजून हर्षद ला पैसे देयची कि बँक रिसिप्ट खरी (ORIGINAL) आहे आणि त्यांना गव्हर्नमेंट सिक्युरिटी मिळाली आहे. हर्षद ने या पैशांचा उपयोग शेअर मार्केट मध्ये कंपन्यांच्या किमती वाढवण्यासाठी केला. या पैशांचा उपयोग करून काही स्टॉक ची किंमत खुप वरच्या भावात घेऊन गेला. हर्षद ने ACC या कंपनीची किंमत काही महिन्यातच २०० रुपयांवरून ९००० रुपयांपरीयंत नेली. बँक मधून मिळालेला पैसा हर्षद जास्त प्रमाणात शेअर मार्केट मध्ये गुंतवत गेला ज्याने शेअर्सची किंमत वाढतच गेली आणि बाजारात एक तेजी निर्माण झाली. शेअर मार्केट मधल्या तेजीचा उत्साह बघून सामान्य लोक सुद्धा शेअर बाजारात गुंतवणूक करायला लागले. जेव्हा शेअर बाजार वरच्या भावात असत तेव्हा हर्षद ते शेअर्स विकायचा आणि चांगला नफा (PROFIT) कमवायचा आणि बँकांना पैसे परत करून त्यांच्याकडून बनावट (FAKE) रिसिप्ट परत घेयचा आणि हे असाच पुढे चालू राहील जो परियन्त मार्केट मध्ये तेजी होती. आणि नंतर जेव्हा मंदी आली मार्केट मध्ये तेव्हा शेअर्स ची किंमत खाली येयला सुरवात झाली आणि हर्षद ला नुकसान होण्यास सुरवात झाली. तेव्हा बँकांना तो पैसे परत करू शकला नाही. २३ एप्रिल १९९२ ला पत्रकार “सुचेता दलाल TIMES OF INDIA ” मध्ये हर्षद मेहता “घोटाळा (SCAM)” उघडकीस आणला. नंतर बँकांना समजला हर्षद ने दिलेली बँक रिसिप्ट तर बनावट आहे त्यांची काहीच किंमत (VALUE) नाही आहे त्याच्या बदल्यात हर्षद ने करोडो रुपये घेतले होते. बँकांना त्या वेळेस ५००० ते ६००० करोड रुपयांचे नुकसान झाले होते. आणि ही रक्कम त्या वेळेस खूप जास्त होती.

जेव्हा हा घोटाळा समोर आला तेव्हा शेअर बाजार खूप कोसळल होत. खूप साऱ्या लोकांना नुकसान झालं होत. काही सामान्य गुंतवणूकदारांनी आत्महत्या केली होती. VIJAYA BANK चे चेअरमन ज्यांनी हर्षद च्या नावाने बनावट रिसिप्ट बनवल्या होत्या हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आत्महत्या केली.

बँकेने हर्षद मेहता कडून पैसे मागायला सुरवात केली मार्केट मध्ये मंदी असल्यामुळे शेअर्सची किंमत खाली आल्यामुळे त्याला खूप नुकसान झाले होते त्यामुळे हर्षद बँकांना पैसे परत नाही देऊ शकला.

CBI ने ९ नोव्हेंबर १९९२ ला हर्षद ला अटक केली हर्षद वर ६०० CIVIL ACTION SUITS आणि ७० CRIMINAL CASES दाखल झाले.

SECURITY EXCHANGE BOARD OF INDIA (SEBI) ने हर्षद मेहता ला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी बॅन केले. हर्षद ठाणे जेल मध्ये बंद होता अचानक त्याच्या छातीत दुखू लागला ३१ डिसेंबर २००१ ची रात्र पूर्ण जग नवीन वर्षाचं स्वागत करत होत तेव्हा हर्षद मृत्यूशी झुंज देत होता आणि रात्री १२:३० वाजता हर्षद चा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाला तेव्हा २७ केसेस त्याच्या विरोधात पेंडिंग होत्या.

हर्षदची LIFE STYLE एका अभिनेत्या सारखी होती त्याला स्टॉक मार्केटचा “अमिताभ बच्चन” बोलत होते. २६ करोड चा TAX भरून हर्षद त्या वर्षी सर्वात जास्त TAX भरणारा व्यक्ती बनला होता.

हर्षद कडे त्या वेळेस ३० अलिशान गाड्या होत्या त्यात LEXUS सारखी महागडी गाडी होती जी हि गाडी सहजासहजी कोणाकडे नव्हती. केतन पारेख हर्षदच्या ऑफिस मध्ये ट्रेनी म्हणून जॉईंट झाला होता. पुढे जाऊन त्याने सुद्धा घोटाळा केला. पुढच्या ब्लॉग मध्ये आपण केतन पारेख विषयी माहिती घेणार आहोत.

आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं हे कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका.

गुंतवणूक विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही मला ९६६४३३७८३६ या नंबर वर संपर्क करू शकता.

धन्यवाद.

2 Responses

Leave a Reply

Don`t copy text!
×