राधाकिशन दमानी यांनी कसे कमावले शेअर मार्केट मधून करोडो रुपये?

Vivek Investment > Marathi > राधाकिशन दमानी यांनी कसे कमावले शेअर मार्केट मधून करोडो रुपये?

भारतातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारश्री राकेश झुनझुनवालायांचे गुरु आणि करोडपती  “श्री राधाकिशन दमानी” यांच्या विषयी आपण या ब्लॉग द्वारे माहिती घेणार आहोत

               शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी राधाकिशन दमानि  बॉल बेअरिंगचा उद्योग व्यवसाय करत होते. सुरवातीच्या दिवसात त्यांनी ट्रेडिंग करून MNC कंपनी मध्ये गुंतवणूक करून त्यांनी पैसे कमावले. १९९० च्या काळात जेव्हा हर्षद मेहता काही कंपन्यांचे शेअर्स गैर मार्गाने (MANIPULATE) करत होता तेव्हा त्यांनी शॉर्ट सेलिंग (SHORT SELLING) करून नफा (PROFIT) कमावला. ज्या लोकांनी शॉर्ट सेलिंग काय आहे माहीत नाही त्यांना मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. शेअर ट्रेडिंग करताना आपण पहिले शेअर विकत घेतो आणि नंतर विकतो  पण शॉर्ट सेलिंग मध्ये उलट असत शॉर्ट सेलिंग मध्ये पहिले शेअर्स  विकले जातात आणि मग त्यांना विकत घेतले जातात

              जेव्हा कुठल्या  ट्रेडर्स ला असं वाटतंय कि कुठल्यातरी कंपनीचे शेअर्स खाली जाणार आहे तेव्हा तो ट्रेडर त्यात शॉर्ट सेलिंग (SHORT SELLING) करतो. शॉर्ट सेलिंग विषयी माहिती आपण पुढच्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत.

               हर्षद मेहताच्या ब्लॉग मध्ये आपण पहिले कि हर्षद बँकेचे पैसे घेऊन नियमबाह्य पद्धतीने शेअर्सचे भाव वर खाली करायचा. त्याने ACC या कंपनीचे शेअर्स २०० रुपयांवरून ९००० रु. परियन्त घेऊन गेलाया ACC कंपनीचे फंडामेंटल (FUNDAMENTAL) काही चांगले नव्हते तरीसुद्धा या कंपनीचे भाव वाढत होते. हे सगळी परिस्थिती राधाकिशन दमानी यांना आश्चर्यचकित करणारी होती. त्यांना माहित होत हर्षद मेहता या कंपन्यांचे शेअर्स गैरमार्गाने हाताळत आहे. आणि एवढ्या हाय प्राइजवर हे शेअर्स टिकणार नाही आणि जसे हर्षद मेहताचे फंड संपून जातील तेव्हा हे शेअर्सची किंमत खाली जाणार. हर्षद जे शेअर्स गैरमार्गाने हाताळत होता त्या शेअर्सना दमानी सर शॉर्ट सेलिंग करत होते. पण दमानी साहेबांना हर्षदच्या फंड बद्दल माहित नव्हते एवढा सगळं फंड हर्षद कडे कुठून येतोय याची काहीच कल्पना नव्हती. हर्षद शेअर्स विकत घेत होता आणि दमानी सर शेअर्स शॉर्ट सेलिंग करत होते ह्यात दमानी यांना नुकसान सुद्धा खूप होत होते पण जेव्हाहर्षद मेहता स्कॅमउघडकीस आला तेव्हा ते शेअर्स खूप जास्त प्रमाणात खाली पडले आणि दमानी यांना खूप नफा झाला.

               दोनतीन वर्षानंतर VALUE INVESTOR “चंद्रकांत संपतयांनी value investing चा अभ्यास करून खूप यश (SUCCESS) मिळवलं होत त्यांची प्रेरणा (Inspiration) घेऊन राधाकिशन दमानी यांनी अभ्यास करून आपलं लक्ष दिर्घ काळ गुंतवणूक (LONG TERM INVESTMENT) कडे वळवलं. दमानी सर चांगले फंडामेंटल वाले शेअर्स शोधून जे एकदम कमी भावात मिळत आहे ते शेअर्स विकत घेयचे आणि ते दीर्घ काळपरियंत (HOLD) ठेवायचे. राधाकिशन दमानी यांनी दीर्घ काळ गुंतवणूक करून नफा कमावला आहे पण जेव्हा त्यांना छोटी संधी मिळते तेव्हा ते ट्रेडिंग सुद्धा करतात. २०००२००१ मध्येकेतन पारेखने घोटाळा केला होता काही शेअर्सची किंमत गैरमार्गाने वरती घेऊन जात होता तेव्हा सुद्धा दमानी यांनी शॉर्ट सेलिंग करून चांगला नफा कमावला होता.

          राधाकिशन दमानी यांनी २००० साली VST Industries ८५ रु याना विकत घेतले होते आणि आज त्याची किंमत ३०००  रुपयांपेक्षा जास्त आहे. HDFC Bank, GATI, BLUE DART, SUNDARAM FINANCE, GILLETTE, INDIA CEMENT . शेअर्स मध्ये त्यांनी खूप पैसे कमावले आहे. दमानी सर दीर्घकाळ गुंतवणुकीवर विश्वास ठेवतात आणि ते ते १० वर्षांपरीयंत गुंतवणूक करतात

दमानी सरांना CONSUMER BUSINESS मध्ये खूप आवड होती आणि त्या उद्योग व्यवसायामध्ये गुंतवणूक पण केली होती. Dmart  सुरु करायच्या आधी त्यांनी नवी मुंबई नेरुळ येथेआपना बाजारची Franchise घेतली होती त्या बिझनेस मध्ये  त्यांना Retail बिझनेस बाबत खूप काही शिकायला मिळाले. २००२ मध्ये त्यांनी Dmart या सुपर मार्केट ची स्थापना केली. “बिझनेस असो कि गुंतवणूक दमानी सर दीर्घकाळ गुंतवणुकीचा विचार करत असतात”.  २००१२००२ मधे REAL ESTATE चे भाव खूप खाली आले होते याचा दमानी सरानी खूप फायदा उच्चल्ला त्यांनी Dmart साठी वेगवेगळ्या ठिकाणी मालमत्ता विकत घेयला सुरवात केली

त्यांनी त्या वेळेस काही मालमत्ता (PROPERTY) ठाणे आणि नवी मुंबई येथे विकत घेतली कारण तिथे प्रॉपर्टी चे रेट खूप कमी होते. त्यांनी या कारणांसाठी विकत घेतले कि पुढच्या काही वर्षांमध्ये ठाणे आणि नवी मुंबईचा विकास झाला तर घेतलेली प्रॉपर्टी हे मुख्य ठिकाणी येतील आणि त्याचे रेट पण वाढतीलदमानी सरांचा  दीर्घकाळ गुंतवणुकीचा द्रुष्टिकोन हा Dmart साठी खूप फायदेशीर झाला. Dmart ची कुठलीही शाखा हि मॉल मध्ये नाही त्यांची दुकाने हि स्वतःची आहे

बिझनेस आणि गुंतवणूक या दोन गोष्टींमध्ये दमानी सर आपली स्वतःचे तत्वज्ञान (Philosophy) चा वापर करतात यावर लोक काय म्हणतील याचा ते कधीच विचार करत नाहीं. सगळे रिटेल बिझनेस वाले त्यांचा बिझनेसचा विस्तार (Expansion) करण्याच्या मागे होते तेव्हा दमानी सरानी आपल्या तत्वन्यानाचा मार्ग अवलंबवून Dmart चा विस्तार ना करता त्याच्या नफ्यावर (Profit) वर लक्ष दिले आणि त्या नंतर Dmart चा विस्तार करण्यास सुरवात केली. Dmart चे २०११ परियन्त फक्त ३० दुकाने होती. आणि नंतर ते वर्षात त्यांनी १०० पेक्षा जास्त दुकाने सुरु केलीजेव्हा E-commerce चा ट्रेण्ड चालू झाला तेव्हा रिटेल बिझनेस तज्ञ् (Expert) त्यांना E-Commerce मध्ये जायला सांगत होते पण दमानी यांनी ब्रांच वर लक्ष केंद्रित केले आणि त्याला चांगल बनवण्यात लक्ष दिले आणि या गोष्टींचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. Dmart आज भारतातील सर्वात जास्त नफा कमावणारी रिटेल बिझनेस आहे.

           १९९५ मधे दमानी सर HDFC bank चे मोठे शेअर्स होल्डर होते तेव्हा काही गुंतवणूकदारांनी त्यांना विचारले कि मार्केट मध्ये खूप बँकिंग स्टॉक खूप कमी किमतीत उपलब्ध आहेत तर तुम्ही HDFC Bank मधे का गुंतवणूक करत आहात? काही वर्षानंतर तो शेअरची किंमत वाढली होती तेव्हा त्या गुंतवणूकदारांना त्याचा प्रश्नाचं उत्तर मिळालं

            राधाकिशन दमानी यांच्याकडे कुठलीच कॉलेज डिग्री नाही आहे. मुंबई युनिव्हर्सिटी मधून B.com च्या पहिल्या वर्षांनंतर त्यांनी शिक्षण सोडून दिले. त्यांच्याकडे कुठलीच डिग्री नसताना सुद्धा ते भारतातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार आणि उद्योजक आहेत. दमानी यांनी दाखवून दिले कि शिक्षित असण्यापेक्षा दृढनिश्चयी (Determination) असणे फार महत्वाचे आहे. दमानी सर सुद्धा बाकीच्या गुंतवणूकदारांसारखे आपल्या चुका मान्य करतात. एक आदर्श उद्योगव्यवसाय कसा असला पाहिजे हे सुद्धा त्यांनी कंपनी आणि शेअर्सचा अभ्यास करून समजून घेतले. शेअर मार्केट गुंतवणूकदारांचं काम असत कि चांगला बिझनेस असलेले शेअर्स शोधावे पण राधाकिशन दमानी यांनी चांगले शेअर्स शोधण्या बरोबर एक चांगला बिझनेस पण करून दाखवला आहे. ते म्हणतात “मी माझ्या जीवनात गुंतवणुकीतून खूप काही शिकलो आहे”. राकेश झुनझुनवाला म्हणतात कि “माझे वडील आणि राधाकिशन दमानी मला मार्गदर्शन करायला नसते तर आज मी यशस्वी झालो नसतो”.

              APTECH Ltd, CRISIL Ltd या कंपनी मध्ये राकेश झुनझुनवाला आणि दमानी सरांचा खूप जास्त प्रमाणात गुंतवणूक केली आहे. राधाकिशन दमानी खूप साधे जीवन जगतात ते नेहमी पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घालतात म्हणून त्यांना काही लोक Mr. White & White सुद्धा बोलतात. दमानी सर मीडिया आणि मोठमोठे समारंभ यांपासून  राहतात. ते एक इंग्रजी मध्ये म्हणतात ना Action Speaks Louder than Words असं त्यांच्या बाबतीत आहे. 

          आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं ते कंमेंट मध्ये लिहायला विसरू नका.  

          शेअर मार्केट विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या www.vivekinvestment.com या वेबसाइट ला भेट द्या.

           शेअर मार्केट विषयी अधिक माहिती  हवी असल्यास ९६६४३३७८३६ या नंबर वर कॉल करू शकता.

 

धन्यवाद. 

2 Responses

Leave a Reply

×